पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सध्या मुंबईत दाखल झाले आहेत. दौऱ्यादरम्यान डोवाल यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानावर भेट घेतली. डोवाल आणि मुख्यमंत्र्यांची ही सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात येत आहे. डोवाल यांनी सकाळीच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचीही भेट घेतली होती. जवळपास अर्धा तास विविध मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ५ स्प्टेंबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्तपूर्वी सुरक्षाविषयक आढावा घेण्यासाठी डोवाल मुंबईत दाखल झाले आहेत.

हेही वाचा- शिवतीर्थावर दसरा मेळावा कोण घेणार? किशोरी पेडणेकरांचे सूचक ट्वीट, म्हणाल्या….

sanjay raut
खासदार संजय राऊत म्हणाले, गद्दारीची कीड..
Udayanraje Bhosle filled the nomination form in a show of strength
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत उदयनराजेंनी भरला उमेदवारी अर्ज
Tanaji Sawant, Archana Patil, Tanaji Sawant silence,
अर्चना पाटील उमेदवारीनंतर समर्थकांच्या आंदोलनावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे मौन
Chief Minister Eknath Shinde
“मला रोज फोन यायचे, साहेब त्यांना काहीतरी सांगा”; शिवतारेंच्या निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला किस्सा

राज्यपालांच्या भेटीचा फोटो ट्वीट

राज्यपाल कार्यालयाकडून डोवाल आणि कोश्यारींच्या भेटीचा फोटो ट्वीट करण्यात आला आहे. राज्यपाल कोश्यारी आणि डोवाल यांची सदिच्छा भेट झाली असं म्हणत हा फोटो ट्वीट केला आहे.

पोलीस अधिकाऱ्यांकडून सुरक्षाविषयक आढावा घेणार

अजित डोवाल पोलीस महासंचालक रजनीश शेठ तसेच पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही भेट घेणार आहेत. त्यांच्याकडून सुरक्षाविषयक आढावा घेणार आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत घातपात घडविण्याच्या धमक्या आल्या होत्या. तसेच दोन आठवड्यांपूर्वी रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे शस्त्रास्त्रांनी भरलेली बोटही आढळून आली होती. याच अनुषंगाने डोवाल हे पोलीस अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्याकडून सुरक्षाविषयक आढावा घेणार आहेत.

हेही वाचा- “…म्हणून मैदानही तेच राहणार” दसरा मेळाव्यावरून अंबादास दानवेंचा शिंदे गटाला खोचक टोला!

कोण आहेत अजित डोवाल?

अजित डोवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. १९६८ च्या आयपीएस केडरचे ते अधिकारी आहेत. २००५ साली इंटेलिजेंस ब्युरोच्या प्रमुख पदावरून ते निवृत्त झाले. उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईकचे नियोजन आणि धोरण ठरवण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. सैन्याकडून देण्यात येणार्‍या किर्ती चक्राने सन्मानित पहिले पोलीस अधिकारी आहेत.