काही दिवसांपूर्वी शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरे एकदिवसीय बिहार दौऱ्यावर गेले होते. तेव्हा आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेतली होती. “तेजस्वी यादव आणि मी एकाच वयाचे आहोत. ते उपमुख्यमंत्री म्हणून चांगले काम करत आहेत. त्यामुळे वातावरणीय बदल आणि पर्यावरण विषयावर चर्चा झाली,” असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.

यावरून आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आदित्य ठाकरेंना ‘पप्पू’ म्हणत टीका केली आहे. “छोटे पप्पू महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात गेले होते. महाराष्ट्रातील लोकांवर यांचा भरवसा नाही का? महाराष्ट्राने आतापर्यंत दुसऱ्यांना प्रेरणा दिली, याचा विसर पडला का? राज्यातील नेत्यांनी कधीही दुसऱ्यांसमोर हात पसरला नाही,” असेही नवनीत राणा म्हणाल्या.

हेही वाचा : “नितू, निलू आगाऊ लेकरं,” सुषमा अंधारेंचा खोचक टोला; म्हणाल्या, “नारायण राणेंनी संस्कार…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्धव ठाकरेंच्या चिखलीतील सभेवरूनही नवनीत राणांनी हल्लाबोल केला. “उद्धव ठाकरे फक्त टीका करण्यासाठी सभा घेतात. ते म्हणतात रस्त्यावर उतरा, पण आपण कधी मातोश्री सोडून शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणार आहात. शिंदे सरकारने शेतकऱ्यांसाठी काही केलं नाहीतर, तुम्ही अडीच वर्षात काय केलं, याच स्पष्टीकरण द्यायला हवे,” असेही नवनीत राणा यांनी म्हटलं.