एका मागासवर्गीय समाजातून आलेली एक महिला. या समाजासाठी स्वतःला समाजकार्यात झोकून दिलं. नाभिक समाजाच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर पर्याय शोधले. दयनीय जीवन जगणार्‍या लोकांना त्यांनी जगण्याचा नवा मार्ग दाखवला त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध केला, व्यवसायाच्या संधी त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिला. नाभिक समाजाच्या लोकांना मिळणाऱ्या तुच्छ वागणुकीविरोधात त्यांनी आवाज उठवला. “नाभिक समाजाला बारा बलुतेदारांच्या सवलती मिळत नव्हत्या. नाभिक समाजाला अनेक उपेक्षा सहन कराव्या लागत होत्या. चौथीत असताना एका लग्नात गेले होते. तिथे आम्हाला आमचं ताट घेऊन जावं लागलं. त्यानंतर अन्न वरुन वाढलं गेलं. ते मला मुळीच पटलं नाही. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे संस्कार माझ्या वडिलांनी माझ्यावर घडवले होते. त्यामुळे संघर्ष सुरु केला,” असं सुमन पवार सांगतात. हा प्रेरणादायी संघर्ष सुमन पवार यांनी नक्की कसा सुरु केला आणि त्याला कशापद्धतीने यश मिळालं हे आज आपण ‘जागर नवदुर्गांचा’ या नवरात्र विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने जाणून घेणार आहोत.

हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला हे युट्यूब व फेसबुकच्या कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा.