गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी भर चौकात विशेष पोलीस अधिका-याची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना आज (रविवारी) घडली. विठ्ठलकुमार मेटे (वय ४१) असे विशेष पोलिस अधिका-याचे नाव आहे.
गडचिरोली येथे दर रविवार प्रमाणे मोठा बाजार भरला होता. त्यावेळी आहिरे भागातील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले मेटे हे दुपारी गावातील बाजारात फिरत होते. या दरम्यान काही नक्षलवाद्यांनी मेटे यांना गाठले व त्यांच्यावर भर बाजारात गोळीबार करुन तेथून पोबारा केला. भर चौकात ही हत्या झाल्याने बाजारात खळबळ माजली. तेथे असलेल्या पोलीस पथकाने नक्षलवाद्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत नक्षलवादी जंगलाच्या दिशेने पळण्यात यशस्वी झाले. या घटनेनंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी विभागात बंदोबस्त वाढवला आहे. मात्र, अद्याप पोलिसांच्या काहीही हाती लागलेले नाही.
संग्रहित लेख, दिनांक 20th Apr 2014 रोजी प्रकाशित
भर चौकात नक्षलवाद्यांनी केली पोलिसाची हत्या
गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी भर चौकात विशेष पोलीस अधिका-याची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना आज (रविवारी) घडली.

First published on: 20-04-2014 at 05:40 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naxalist killed one special police officer