लोकसभा निवडणुका आता एक वर्षावर येऊन ठेपल्या आहेत. अनेक राजकीय पक्ष या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. युत्या-आघाड्यांमध्ये जागांची चाचपणी सुरू आहे. तसेच जागावाटपांबाबत चर्चादेखील सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्रातील पक्षही लोकसभेच्या तयारीला लागले आहेत. महाविकास आघाडीत लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत चर्चा झाली असल्याचं बोललं जात आहे. अशातच आता महाविकास आघाडीतल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये लोकसभेच्या दोन जागांवरून रस्सीखेच सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.

सोलापूर आणि माढा या दोन जागांवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू झाल्याचं बोललं जात आहे. वास्तविक पाहता सोलापूर लोकसभेची जागा ही काँग्रेसकडे आहे, तर माढा लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. परंतु काही दिवसांपूर्वी या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा सांगितला होता. आता काँग्रेसनेही या दोन्ही जागांवर दावा सांगितला आहे. त्यामुळे या दोन जागांबाबत दोन्ही पक्षांमध्ये आगामी काळात रस्सीखेच पाहायला मिळू शकते.

Mahavikas Aghadi, Bhiwandi
भिवंडीत महाविकास आघाडीत बंडखोरीची चिन्हे, मतदारसंघात पहिल्याच दिवशी ५४ अर्जांचे वितरण
Sharad Pawar group opposition to one country one election
शरद पवार गटाचा ‘एक देश एक निवडणूक’ला विरोध; लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘शपथनामा’ प्रसिद्ध
Sanjay Raut on Congress Sangli
“तुमची नौटंकी…”, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यानाच संजय राऊंताचा इशारा
Jalna Lok Sabha
जालना मतदारसंघात काँग्रेसमध्ये चिडीचूप

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पटोले म्हणाले, आपल्याला राहुल गांधींना या देशाचे पंतप्रधान बनवायचं आहे. म्हणून खासदार निवडून आणण्याची मला तुमच्याकडून हमी हवी आहे. त्यामुळे कोणीही येऊन काहीही बोलून जाईल, पण तुम्ही काही सहन करायचं नाही. मी तुम्हाला सांगतो ही लढाई काँग्रेसची आहे.

हे ही वाचा >> “मुंबईत भाजपाचा महापौर होणार”, आशिष शेलारांचा दावा, तर शिंदे गटाचे नेते म्हणाले, “महाराष्ट्रातील सगळ्या…”

नाना पटोले कार्यकर्त्यांना म्हणाले, तुम्ही म्हणता सुशीलकुमार शिंदेंनी खासदार व्हावं, परंतु त्यांची तयारी तुम्हाला करावी लागेल. ते (शिंदे) तयार नाहीत. ते मला सांगत होते त्यांची यासाठी तयारी नाही. परंतु तुमची इच्छा असेल तर ते निवडणुकीला उभे राहतील. पण ते निवडून आले पाहिजेत, ही जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल. सोलापूरची जागा तर जिंकलीच पाहिजे. त्यासोबत माढ्याची जागा पण जिंकली पाहिजे.