आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकिनंतर राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक, मंत्रीमंडळ विस्तार यासह अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

हेही वाचा – “अख्खा महाराष्ट्र बेवारस असताना…” मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवारीवरून यशोमती ठाकूर यांची बोचरी टीका

विकासकामांच्या संदर्भात आज मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कोणतीही विकासकामे थांबणार नाही, असे आश्वासन दिले. तसेच वढू तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचे कामही थांबवण्यात येणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले असल्याचे अजित पवार म्हणाले. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती आहे, अशा वेळी पालकमंत्र्यांची जबाबदारी महत्त्वाची असते. त्यामुळे मी त्यांना लवकरांत लवकर मंत्रिमंडळ विस्तार करण्याची विनंती केली, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “दोन पक्ष फिरून आलेल्यांनी ज्ञान पाजळू नये”; किशोरी पेडणेकरांची केसरकरांवर टीका

पुढे बोलताना ते म्हणाले, ”राज्य सरकारने हळदीच्या संदर्भात जो निर्णय घेतला आहे, तो निर्णय महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्पात घेतला होता. या सरकारने फक्त त्याला मान्यता दिली. याचबरोबर नियमित कर्ज फेडणाऱ्यांना ५० हजारापर्यंत अनुदान देण्याचा निर्णयही आमच्या सरकारने घेतला होता. तो निर्णय या सरकारने पुन्हा घेतला”