सरस्वती देवीबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ अडचणीत सापडले आहेत. विविध स्तरातून त्यांच्यावर टीका केली जाते. या प्रकरणानंतर चेंबूर येथील व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ते ललित टेकचंदानी यांना धमकावल्याचं प्रकरण समोर आलं आहे. एक व्हिडीओ पाठवल्यानंतर छगन भुजबळांच्या कार्यकर्त्यांनी आपल्यालाशिवीगाळ करत जीवे मारण्याची, गोळ्या घालण्याची धमकी दिल्याचा आरोप टेकचंदानी यांनी केला आहे. याप्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

यानंतर आता छगन भुजबळांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तक्रारदार टेकचंदानी आणि आपल्यात मागील दहा वर्षांपासून वैर आहे. त्यांनी २०१४ ते २०१९ च्या काळात आमच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल केले आहेत. यातील काही प्रकरणं सुटत आहेत. मात्र, काहींना आम्ही अद्याप तोंड देत आहोत, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिली आहे.

याप्रकरणी त्यांनी सांगितलं की, २०१४ ते १९ च्या काळात आमच्यात वाद झाल्यानंतर मी त्यांचा फोन नंबर डिलीट केला होता. तेव्हापासून त्यांच्याशी मी बोललो नाही. आता सरस्वतीदेवी आणि सावित्रीबाई यांच्यावरून जे काही सुरू झालं आहे. याचा फायदा टेकचंदानी यांनी घेतला. दरम्यानच्या काळात मला अनेक मेसेज आणि फोन येत होते. पण टेकचंदानी सतत मेसेज पाठवत होता. त्यामुळे मला सतत त्रास का देतोय? याची विचारणा करण्यासाठी आम्ही त्याला फोन केला. पण त्याने फोन उचलला नाही. त्रास देणारी व्यक्ती नेमकी कोण आहे? हे जाणून घेण्यासाठी कार्यकर्त्यांना सांगितलं.

हेही वाचा- छगन भुजबळांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर नितेश राणेंचं खोचक ट्वीट, म्हणाले ”आता तुम्हाला सरस्वतीही…”

यानंतर दुसऱ्या एका कार्यकर्त्याने त्यांना व्हॉट्सअॅवर मेसेज केला. तेव्हा मी हिंदू आहे, मला बोलण्याचा अधिकार आहे, जय हिंद, असं तो समोरून बोलू लागला. आम्ही पण हिंदू आहोत, नेमकं काय झालंय ते तरी सांग, तुझा पत्ता सांग भेटून बोलता येईल असं त्याला विचारलं. त्यानंतर त्यांनी स्वत:च आपलं नाव सांगितलं. पण मी त्याला फोन केला नाही, व्हॉट्सअप मेसेज केला नाही, धमकी दिली नाही, गोळ्या घालणार असं म्हटलं नाही. हे खरं आहे की माझ्या एका कार्यकर्त्याने फोन केला होता, परंतु टेकचंदानी यांनी तो फोन उचलला नाही. या घटनाक्रमानंतर टेकचंदानी आणि त्यांच्या पीएने आमच्या पहिल्या कार्यकर्त्याला फोन केले. पण आम्ही फोन उचलले नाहीत.

हेही वाचा- “आमचं दुबई कनेक्शन आहे, तुला…” भुजबळांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर तक्रारदाराने सांगितला घटनाक्रम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या सरस्वती देवी प्रकरणावरून जे काही सुरू आहे, त्याचा फायदा घेऊन भुजबळांना त्रास द्यायचा. त्यांचं नाव खराब करायचं, या हेतूने हे सर्व केलं जात आहे. ते स्वत:च मी आरएसएसचा स्वयंसेवक आहे, मी हिंदू आहे, मी राष्ट्रप्रेमी आहे, असं म्हणतात. पण मला ते कधीही काम करताना दिसले नाहीत, असंही भुजबळ म्हणाले.