काही दिवसांपूर्वी जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीवरून माजी मंत्री, भाजपा आमदार बबनराव लोणीकर आणि माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे समोरा-समोर आले होते. यातून राजेश टोपे यांच्या कारची तोडफोड करण्यात आली होती. तर, लोणीकरांच्या घरावर दगडफेक झाल्याचं समोर आलं होतं. अशातच लोणीकरांनी टोपेंना शिवीगाळ केल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष निवडीवरून राजशे टोपे आणि बबनराव लोणीकर यांच्यात वाद झाला होता. त्यातून टोपेंच्या कारची तोडफोड करण्यात आली होती. त्यातच लोणीकरांनी टोपेंना शिवीगाळ केल्याची कथित ऑडिओ क्लिप समाज माध्यमांत व्हायरल झाली आहे. पण, ही क्लिप खोटी असल्याचं लोणीकरांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

कथित व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये काय?

राजेश टोपे – अर्जुनराव साक्षीदार आहे. अर्जुनराव बोलले, मीही बोललो आणि दानवेही बोलले. ते म्हणाले, ‘भैय्यासाहेब आम्हाला काही अडचण नाही. पण, यावेळी पद आम्हाला दिलं पाहिजे.’ तर, काय बोलणार आम्ही? एवढं टोकाचं भांडण झालं. म्हणजे आधी फोनवर बोललो आणि आज ते आले होते. ते म्हणाले ‘आपण बोललो पहिल्यांदा बबनरावांना त्यात, ते आले नाहीत. ते चर्चेत नव्हते.’ मी म्हटलं, ‘ते काहीही असो. पण राहुलला उपाध्यक्ष करायचं आहे.’ तर मला वाटतं, यावेळी पद सोडावं.

बबनराव लोणीकर – भैय्यासाहेब राजकारण मोठं नसतं. त्या उपाध्यक्षपदात काहीही नाही, आम्हाला माहितेय. अर्जुनरावाच्या बंगल्यावर तुम्ही बोलला, चर्चा केली.

राजेश टोपे – आपण शब्द पाळू, पण पुढच्यावेळी बघू ना…

बबनराव लोणीकर – अरे हराXXXXX, कडू, तुझी टक्कल फोडतो, चोर कुXX…

“ऑडिओ क्लिप खोटी”

दरम्यान, व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपवर ‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधताना लोणीकर म्हणाले, “माझी कुठलीही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली नाही. मी काहीही बोललो नाही. ती ऑडिओ क्लिप खोटी आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“बँकेच्या निवडणुकीत वाद तिथेच संपला”

ऑडिओक्लिपबद्दल सायबर पोलिसांत तक्रार करणार का? या प्रश्नावर लोणीकरांनी म्हटलं, “मी आतापर्यंत ऑडिओ क्लिप ऐकली नाही. ती ऐकून पुढील निर्णय घेईन. बँकेच्या निवडणुकीत वाद तिथेच संपला आहे.”