खासदार अमोल कोल्हे यांनी अखेर घोडीवर स्वार होऊन घाट गाजवला आहे. निवडणुकीपूर्वी दिलेले वचन त्यांनी यानिमित्ताने पूर्ण केलं आहे. पुणे जिल्ह्यातील निमगाव दावडी येथे १६ फेब्रुवारी रोजी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैलगाडा शर्यतीच्या ठिकाणी खासदार अमोल कोल्हे यांनी घोडीवर बसून बैलजोडीसमोर बारी मारली. अमोल कोल्हे यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला होता. पण आता त्यांचा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांना तंबी मिळाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याचा व्हिडीओ अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत अमोल कोल्हे हे त्यांचे मित्र शेखर पाचूंदकर यांच्या घरी गेले होते. त्यावेळी शेखर पाचूंदकर यांनी आई अमोल कोल्हे यांची आरती ओवाळताना दिसते. हा व्हिडीओ शेअर करत मातामाऊली अशी काळजी घेतात तेव्हा आणखी बळ मिळतं! काल घाटात घोडी धरल्यावर माझे स्नेही शेखरदादा पाचुंदकर यांच्या मातोश्रींनी आधी दृष्ट काढली आणि परत असं धाडस करताना विचार कर अशी मायेची तंबीही दिली!, असे कॅप्शन अमोल कोल्हेंनी दिले आहे. याचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : माझ्या हत्येचा कट रचला जातोय; सारेगमप विजेती वैशाली भैसनेची फेसबुक पोस्ट; म्हणाली “आज मला…”

शिवाजी आढळराव पाटील नेमकं काय म्हणाले होते?

शिवाजी आढळराव पाटील म्हणाले होते, “खासदार अमोल कोल्हे यांना निमंत्रण दिलं होतं. कोणावर टीका करून तोंड खराब करायचं नाही. काही पत्रकार विचारत होते, सध्याच्या खासदारांना निमंत्रण दिलं का? हो त्यांना जाहीर निमंत्रण दिलं की बैलगाडा शर्यतीसाठी घोडीवर बसायचं असेल तर लांडेवाडीत या.”

आणखी वाचा : “गळ्यात कच्चा बादाम अडकलाय का?” रानू मंडल यांचं गाणं ऐकून नेटकऱ्यांनी लावला कपाळाला हात

“प्रचारादरम्यान अमोल कोल्हे म्हणाले होते की बैलगाडा शर्यती सुरू होतील तेव्हा हा पठ्ठ्या बारीच्या पुढे पहिल्या बारीवर बसेल. म्हणून मी त्यांना विनंती केली. निवडणुकीत जे आश्वासन दिले ते पूर्ण करण्यासाठी का होईना आमच्या घाटात या,” असा खोचक टोला शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी लगावला आहे.

आणखी वाचा : अ‍ॅक्शन, कॉमेडी आणि मसाला! ‘बच्चन पांडे’चा धमाकेदार ट्रेलर पाहिलात का?

अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले होते?

अमोल कोल्हे म्हणाले होते, “हा अमोल कोल्हे मालिका विश्वातून निवृत्ती घेणार आणि तुमच्या सेवेसाठी उपस्थित असणार आहे. तसा दुसरा शब्द बैलगाडा मालकांना देतो. ज्या दिवशी बैलगाडा शर्यत सुरू होईल. त्या दिवशी हा तुमचा पठ्ठ्या पहिल्या बारी पुढे घोडी धरणार म्हणजे धरणार हा शब्द देतो.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp mp amol kolhe associates mother said do not again do horse ride after seeing his video in bullock cart race dcp
First published on: 18-02-2022 at 17:32 IST