राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करत राजीनाम्याची मागणी करणाऱ्या भाजपा नेत्यांना शरद पवारांनी टोला लगावला आहे. बलात्काराच्या आरोपानंतर एकीकडे देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांनी योग्य तपास केला पाहिजे असंत मत व्यक्त केलं असताना इतर नेते नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा अशी मागणी करत आहेत. शरद पवारांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार नाही असं सूचक विधान केलं असून भाजपा नेत्यांवरही निशाणा साधला. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपामध्ये यासंबंधी दोन गट पडल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, “भाजपाचं काय म्हणणं आहे माहिती नाही. काळजीपूर्वक चौकशी केली पाहिजे असं त्यांच्या मोठ्या नेत्याने म्हटलं आहे. त्यांच्याच पक्षातल्या माजी आमदाराने आपला अनुभव सांगितल्यानंतर भाजपा किंवा अन्य कोणी काय म्हणत असेल तर कदाचित ते टीका करण्याची संधी म्हणून करत असावेत. त्यावर काही बोलायचं नाही. हा त्यांचा अधिकार आहे”.

धनंजय मुंडेंसंबंधी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरुन शरद पवारांची माघार; स्पष्टीकरण देत म्हणाले…

“ज्यांच्या हातातून सत्ता गेली आहे त्यांची अस्वस्थता समजू शकतो. ती गेल्यामुळे नाराजी असणार. त्यासाठी ज्यांनी हे सगळं काम केलं असेल त्यांना टार्गेट करुन त्यांना ठोकण्याचं काम करणं हे फारसं वेगळं समजत नाही. हे राजकारणात आक्रमपणे आरोप करणं आणि भूमिका घेण्याचा भाग आहे,” असा टोला शरद पवारांनी भाजपाला लगावला.

धनंजय मुंडे प्रकरणात मोठी अपडेट, तक्रारदार महिलेची माघार; ट्विट करत म्हणाली…

“आरोप करणाऱ्या व्यक्तींच्या सदर्भात अजून तक्रार समोर आल्यानंतर याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशा निष्कर्षावर आम्ही आलो आहोत. पोलीस योग्य काम करतील असा विश्वास आहे. पोलिसांच्या चौकशीत हस्तक्षेप करण्याचं कारण नाही, पण आम्ही तपासात एसीपी दर्जाची माहिला अधिकारी असावी असं सुचवलं आहे. पोलिसांनी सर्वांशी चर्चा करुन वस्तुस्थिती समोर आणण्याचा प्रयत्न करावा,” असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

धनंजय मुंडेंवरील कारवाईसंबंधी शरद पवारांचं सूचक वक्तव्य; म्हणाले…

दरम्यान गुरुवारी केलेल्या वक्तव्यासंबंधी बोलताना ते म्हणाले की, “काल बोललो तेव्हा हे सर्व मला माहिती नव्हतं. एखाद्या भगिनीने तक्रार करणं याची नोंद गांभीर्याने घेतली पाहिजे या भावनेने मी गंभीर शब्द वारपरुन भूमिका घेतली. आता अधिक खोलात जाऊन वास्तव पुढे आणण्याची गरज आहे. कोणत्याही निर्णयावर येणं हा एखाद्यावर अन्याय करण्याची शक्यता नाकारता येत नाही. आम्ही तपासातून येणाऱ्या निष्कर्षाची वाट पाहत आहोत”.

“आरोप करणाऱ्यावर एकाहून अधिक आरोप झाले त्याबाबतही सत्यता जाणून घेण्याची गरज आहे. आरोप झाला म्हणून सत्तेपासून दूर व्हा असे प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पूर्ण शाहनिशा करुन पुढची पावलं टाकणार आहोत,” असं सांगत शरद पवार यांनी धनंजय मुंडे पदावर कायम राहतील असं सूचक विधान केलं.

एफआयआर दाखल होत नसल्याच्या तक्रारदार महिलेच्या आरोपावर ते म्हणाले की, “ही दोन तीन उदाहरणं आली नसती तर वेगळी चर्चा झाली असती. साहजिकच तपास करणाऱ्यांना अधिक काळजीने लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे गुन्हा दाखल झाला नाही यावर भाष्य करण्याची गरज नाही. मुंबई पोलिसावर पूर्ण विश्वास आहे, ते सत्य समोर आणतील”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp sharad pawar on bjp leaders demanding resignation of dhananjay munde sgy
First published on: 15-01-2021 at 16:19 IST