मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली असून पक्षाकडून जय्यत तयारी सुरु आहे. ५ जून रोजी राज ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. दरम्यान राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची जाहीरपणे माफी मागितल्यशिवाय त्यांना अयोध्येत घुसू देणार नाही, असा इशारा भाजपाचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी दिला आहे. इतकंच नव्हे तर, राज यांचा माफीनामा येत नाही, तोपर्यंत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही त्यांची भेट घेऊ नये, असा सल्लाही दिला आहे. या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध; उत्तर भारतीयांची माफी मागण्याची भाजप खासदाराची मागणी

यावेळी शरद पवारांना राज ठाकरेंचा अयोध्या दौरा आणि त्याला भाजपा खासदाराकडून होणाऱ्या विरोधासंबंधी विचारण्यात आलं. त्यावर शरद पवार म्हणाले की, “हा काही राष्ट्रीय प्रश्न नाही. माझा नातूही काल अयोध्येत होता”.

“ज्यांनी मला जातीयवादी म्हणून हिणवत विनोदी वक्तव्य केले, त्यांच्या…”; शरद पवारांचा राज ठाकरेंना टोला

दरम्यान राज्यात सध्या भोंग्यावरुन सुरु असलेल्या राजकारणावर बोलताना ते म्हणाले की, “कोणाचं आर्थिक नुकसान होत नाही, पण भावनांचा प्रश्न आहे. शिर्डीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सकाळी प्रार्थना होते. या निर्णयामुळे ती प्रार्थना बंद झाली. लोक हे चालू करा सांगत आहेत. काही लोकांची भावनेची केंद्रं असतात. अनेक काळापासून सुरु असलेल्या पद्धती सुरु राहाव्यात असं त्यांना वाटत असतं. एखाद्या गोष्टीमुळे त्या बंद झाल्या तर त्याचे परिणाम दिसतात आणि महाराष्ट्रात ते उमटू लागले आहेत”.

“आतापर्यंत लोकांच्या प्रश्नासाठी चळवळी व्हायच्या. हनुमान चालिसा वैगेरे गोष्टी होत नव्हत्या. सामान्य लोकांचे प्रश्न महागाई, बेकारी, कायदा-सुव्यवस्था आहेत. हे सगळे प्रश्न बाजूला राहिले आणि अयोध्येच कायं झालं, प्रार्थना म्हणा सुरु आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे त्यांना मुलभूत प्रश्न सोडवण्यात अपयश आलं असल्याने लोकांचं लक्ष वळण्यासाठी या सगळ्या गोष्टींना प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली जात आहे”, असं सांगत शरद पवारांनी मोदी सरकावर निशाणा साधला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp sharad pawar on mns raj thackeray ayodhya visit sgy
First published on: 10-05-2022 at 09:47 IST