संग्रहालयातला भुसाधारी वाघ हवा की जंगलचा राजा?; शरद पवारांचा सवाल

दरवर्षी २९ जुलै रोजी वाघ संवर्धनासंबंधी जनजागृती करण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा केला जातो

NCP, Sharad Pawar, International Tiger Day,
दरवर्षी २९ जुलै रोजी वाघ संवर्धनासंबंधी जनजागृती करण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा केला जातो

आज जागतिक व्याघ्रदिन साजरा केला जात आहे. दरवर्षी २९ जुलै रोजी वाघ संवर्धनासंबंधी जनजागृती करण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा केला जातो. वाघांच्या नैसर्गिक निवासस्थानाचे संरक्षण करण्यासाठी जागतिक यंत्रणेला चालना देणे आणि व्याघ्र संवर्धनासाठी जनजागृती करणे हे प्राथमिक लक्ष्य आहे. दरम्यान यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्वीट करत जागतिक व्याघ्र दिनानिमित्त निर्धार करण्याचं आवाहन केलं आहे.

“कमी होणारे जंगलक्षेत्र,वृक्षतोड यांसारख्या घटकांमुळे वाघांच्या नैसर्गिक अधिवासावर मोठा परिणाम होत आहे. वाघ नामशेष होऊ नयेत यासाठी अवैध व्याघ्रशिकारीला आळा घालून वाघांच्या अधिवासाचे रक्षण, व्याघ्र प्रकल्प व अभयारण्यांचे संवर्धन करण्याचा या जागतिक व्याघ्र दिनानिमित्त निर्धार करुया,” असं आवाहन शरद पवार यांनी ट्वीट करत केलं आहे.

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस: जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि यंदाची थीम

यावेळी त्यांनी एक फोटो ट्वीट केला असून संग्रहालयातला भुसाधारी वाघ की निसर्ग साखळीतला जंगलाचा राजा? असा प्रश्नही विचारला आहे.

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाचा इतिहास

जागतिक स्तरावर वाघांची घटती संख्या कमी करण्यासाठी जनजागृती करण्याच्या उद्धेशाने रशियामधील सेंट पीटर्सबर्ग व्याघ्र परिषदेत देशांनी २०१० मध्ये केलेल्या कराराची आठवण म्हणून हा दिवस दरवर्षी २९ जुलै रोजी केला जातो. तसेच यावेळी २०२२ पर्यंत ज्या देशात वाघांची संख्या कमी आहे त्यांनी ती संख्या जवळपास दुप्पट करण्यासाठी प्रयत्न करावेत असा निर्धार व्यक्त करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवसाची थीम आणि महत्त्व

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन दरवर्षी “त्यांचे अस्तित्व आमच्या हातात आहे” या घोषणेने किंवा थीमने साजरा केला जातो. वाघाची घटती संख्या आणि जगभरात वाघांचे संवर्धन करणे हे मुख्य उद्दीष्ट आहे. जागतिक वन्यजीव निधी (WWF) च्या मते जागतिक पातळीवर फक्त ३९०० एवढेच वाघ शिल्लक आहेत. २० व्या शतकाच्या सुरूवातीपासूनच वाघांची संख्या कमी होण्यास सुरुवात झाली. याच एक मुख्य कारण शिकार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ncp sharaf pawar tweet over international tiger day sgy