राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भविष्यातील राजकारणातील आपली वाटचाल कशी असेल याबद्दल सांगताना वडील शरद पवारांनी दिलेल्या एका सल्ल्याची आठवण करुन दिली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा भविष्यवेध घेण्याच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’कडून आयोजित ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या दूर-संवादमालिकेत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी खासदार म्हणून संसदेत पहिल्यांदा जाताना शरद पवारांनी काय सांगितलं होतं याचा खुलासा केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार येईल असं वाटलं होतं का?; सुप्रिया सुळे म्हणतात…

भविष्यात तुमचं राजकारण दिल्लीचं असणार की महाराष्ट्रात? असं विचारण्यात आलं असता सुप्रिया सुळेंनी सांगितलं की, “महाराष्ट्रातून निवडून जाते तर महाराष्ट्राशिवाय मला दिल्ली मिळणारच नाही. मला आई-बाबा खूप कमी सल्ले देतात पण त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या आहेत ज्या मी आवर्जून लक्षात ठेवते”.

“मी पहिल्यांदा संसदेत जाताना शरद पवारांनी सांगितलं होतं की, तू संसदेमध्ये पहिल्यांदा जात आहेस. ती पायरी चढण्याची संधी मिळत आहे हे तुझं भाग्य आहे. बारामतीमधल्या लोकांमुळे ही संधी मिळाली आहे हे लक्षात ठेव. जेव्हा तुला ही पायरी मी चढत आहे आणि बारामतीच्या लोकांना विसरशील त्यादिवशी ती पायरी तुला चढता येणार नाही. ही गोष्टी मी पक्की लक्षात ठेवली आहे”.

तू राजकारणाच्या फंद्यात पडू नकोस असं कधी आई-वडिलांनी सांगितलं का?; सुप्रिया सुळे म्हणाल्या…

“दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्र असेल तर दिल्लीच आहे. महाराष्ट्रातून कामं, निवडणूक सोडलं तर दिल्लीत कोणी विचारणार नाही. हे वास्तव आहे याची जाणीव मला आहे,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp supriya sule loksatta drushti ani kon progamme sharad pawar parliament sgy
First published on: 31-05-2021 at 18:59 IST