अहिल्यानगर : हिंदसेवा मंडळाच्या पेमराज सारडा महाविद्यालयाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शारदा व ज्ञानेश्वर वाद स्पर्धेत नगरमधील न्यू लॉ महाविद्यालय तर ज्ञानेश्वर करंडक वाद स्पर्धेत श्रीगोंद्यातील छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालयाने विजेतेपद मिळवले. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना चांदीचा करंडक व रोख पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे: शारदा करंडक-न्यू लॉ महाविद्यालय (प्रथम, नगर), न्यू आर्ट्स कॉमर्स महाविद्यालय (पारनेर, द्वितीय) व पीव्हीपी महाविद्यालय (लोणी, तृतीय). वैयक्तिक- सार्थक क्षीरसागर (प्रथम, मॉडर्न महाविद्यालय, पुणे), संदीप लांडगे (द्वितीय, न्यू लॉ) व आशुतोष भागवत (तृतीय, न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय, नगर).

ज्ञानेश्वर करंडक- छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालय (प्रथम, श्रीगोंदे), रेसिडेन्शियल कनिष्ठ महाविद्यालय (द्वितीय, नगर), व भाऊसाहेब फिरोदिया विद्यालय (तृतीय, नगर). वैयक्तिक- हर्षद थोरात (प्रथम, अध्यापक विद्यालय, नगर), माएशा शेख (द्वितीय, श्रीगोंदे) व आकांक्षा चतुर्वेदी (तृतीय, मानधना महाविद्यालय, नगर).

वाद ही अंगभूत कला आहे, स्पर्धेमुळे नव्या पिढीकडून ज्वलंत व महत्त्वाच्या विषयावर वैचारिक मंथन होते, असे प्रतिपादन भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी यावेळी बोलताना केले. डॉ. रमेश झरकर म्हणाले की, वक्ता हा दहा हजारात एखादा असतो, त्यामुळे चांगला वक्त होण्यासाठी महाविद्यालयीन जीवनामध्ये वादविवाद स्पर्धेत सहभाग घेणे आवश्यक आहे. सारडा महाविद्यालय गेल्या ४९ वर्षांपासून विद्यार्थ्यांसाठी ही संधी उपलब्ध करून देत आहे. प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य डॉ. राजेंद्र शिंदे, संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. रमेश झरकर, सचिव संजय जोशी, पदाधिकारी अँड. अनंत फडणीस, डॉ. पारस कोठारी, अजित बोरा, रणजित श्रीगोड, प्रा. ज्योती कुलकर्णी, अनिल देशपांडे, प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावित आदी उपस्थित होते.