मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांना विरोध करत हनुमान चालिसा लावण्याचे आदेश मनसैनिकांना दिल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यानंतर आता विविध पक्षांकडून मनसेला प्रत्युत्तर देण्यात येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी पुण्यातील खालकर चौकातील मारुती मंदिर येथे महाआरती केली. त्यानंतर सामाजिक सलोखा कायम रहावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कर्वेनगर येथील हनुमान मंदिरात मुस्लिम नागरिकांच्या हस्ते हनुमान जयंतीची आरती करण्यात आली.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप उपस्थित होते. यावेळी प्रशांत जगताप यांनी हनुमान चालीसा म्हणली, तर मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले. यावेळी हनुमान जयंती निमित्त मंदिरामध्ये अजित पवार यांनी आरती केली. यावरुन आता माजी खासदार निलेश राणे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

Rashmi Thackeray in Thane for Chaitra Navratri festival
ठाण्यात चैत्र नवरात्रौत्सवासाठी रश्मी ठाकरे उपस्थिती… ठाकरे गटाचे शक्तीप्रदर्शन
Ram Navami 2024 Sury Tilak Festival
Ram Navami: अयोध्येत प्रभू रामाच्या मूर्तीचा सूर्यतिलक! डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
Ram Navami, High Court, State Govt,
रामनवमीला खबरदारी घ्या! उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
sangeet natak akademi kolhapur marathi news
संगीत नाटक अकादमीच्या वतीने अंबाबाई मंदिरात बुधवार, गुरुवारी ‘शक्ती महोत्सवा’चे आयोजन

निलेश राणे यांनी ट्विट करत अजित पवार यांना टोला लगावला आहे. “आज कधी नव्हे ते अजित पवारांना हनुमान जयंतीच्या निमित्ताने आरती करताना बघितलं, काय अजित पवार साहेब कसं वाटलं जबरदस्ती आरती करताना?? हनुमान जयंतीनिमित्त वातावरण ढवळून निघाल्याने ज्यांना मंदिरात जायची एलर्जी होती ते सुद्धा भगवे पट्टे घालून मंदिरात धडपडत होते,” असे निलेश राणेंनी म्हटले आहे.

यावेळी बोलताना अजित पवार यांनी स्वधर्माचा अभिमान बाळगताना अन्य धर्मियांच्या परंपरांचा आदर करण्याची पूर्वजांची शिकवण आहे असे म्हटले. “देशाची ताकद आपल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक विविधतेत आहे. सर्वधर्मियांनी एकत्रित येऊन सण-उत्सव साजरे करणं ही आपली परंपरा, संस्कृती आहे. स्वधर्माचा अभिमान बाळगताना अन्य धर्मियांच्या परंपरांचा आदर करण्याची पूर्वजांची शिकवण आहे. या शिकवणीचं पालन हनुमान जयंतीनिमित्त पुण्यात कर्वेनगर इथल्या हनुमान मंदिरात मुस्लिम बांधवांच्या हस्ते श्रीहनुमानजींची आरती करून करण्यात आलं. राष्ट्रवादी पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी हनुमान चालीसाचं पठण करून हनुमान जयंती साजरी केली. सोहेल शेख यांनी रमझानचं दुवा पठण केलं,” असे अजित पवार म्हणाले.

“हनुमान मंदिराच्या प्रांगणात हिन्दू-मुस्लिम बांधवांनी रोजा-इफ्तारचा सहआनंद घेऊन सर्वधर्मसमभावाचं, एकता-बंधुतेचं अनोखं दर्शन घडवलं. सर्वधर्मीयांना सोबत घेऊन महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर अग्रेसर ठेवण्याचं कार्य राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता यापुढेही करत राहील,” असेही अजित पवार म्हणाले