सोलापूर, अकोला : सोलापूरजवळ रविवारी रात्री आणि बुलढाणा येथे सोमवारी पहाटे झालेल्या दोन वेगवेगळय़ा अपघातांमध्ये नऊ भाविकांचा मृत्यू झाला. दोन्ही अपघातांत २६ जण जखमी झाल़े 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकादशीनिमित्त पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी तुळजापूरहून निघालेल्या भाविकांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला मागून आलेल्या मालमोटारीची जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर १९ जण जखमी झाले. जखमींपैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. सोलापूर-पुणे महामार्गावर सोलापूरजवळ कोंडी येथे रविवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींवर सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातातील मृत व जखमी असे सर्व जण वारकरी सांप्रदायातील असून, मूळचे तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी येथील आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा शहराबाहेरील वळणावर सोमवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास दुसरा अपघात झाला. शेगाव येथे दर्शनासाठी निघालेल्या जालना जिल्ह्यातील भाविकांचे वाहन आणि ट्रक यांच्यात धडक झाल्याने पाच ठार, तर सात जण गंभीर जखमी झाले.

जालना जिल्ह्यातील रोहनवाडी येथील १२ भाविक संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगाव येथे चारचाकी वाहनाने येत होते. देऊळगाव राजा शहराबाहेरील वळणावर समोरून येणाऱ्या ट्रकने भाविकांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात  अर्जुन पाडमुख (६०), कांताबाई पाडमुख (५५), श्रीमंत पाडमुख, सर्व रा.रोहनवाडी, कपिल गायकवाड (३२) रा. देवडे हातगाव व चालक आकाश लिहणार (२७) कारखेडा ता. अंबड जि. जालना अशा पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर आम्रपाली पाडमुख (३५), मीनाबाई पाडमुख (३५), अशोक  लिहणार (४०), तुकाराम खांडेभराड (४०), मीराबाई बाळराज (४०), बाबुराव कापसे (५०), परमेश्वर बाळराज (३९) हे गंभीर जखमी झाले. 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nine killed in in two separate accidents in maharashtra zws
First published on: 15-03-2022 at 00:14 IST