मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अशोभनीय आणि समाजात तेढ पसरवणारे विधान केल्याच्या आरोपावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी मंगळवारी संगमेश्वर येथे अटक केली. राणे यांना महाड प्रथमवर्ग दंडाधिकाऱ्यांनी रात्री जामीन मंजूर केला. मात्र, दिवसभर राणे यांच्या विधानाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले. अनेक ठिकाणी शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने आल्याने राजकीय वातावरण तापले. सोमवारी रात्री राणेंनी मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. मुंबईमध्ये शिवसेनेनं राणेंविरोधात पोस्टरबाजी केल्यानंतर नितेश राणेंनी ट्विटरवरुन जुहूतील घराखाली शिवसेैनिक जमा झाल्याचं मध्यरात्रीनंतर केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. मंगळवारच्या नाट्यमय घडामोडींनंतर राणेंना जमीन मंजूर करण्यात आल्यावर नितेश यांनी पुन्हा एकदा एक व्हिडीओ पोस्ट करत आपल्या राजकीय विरोधकांना फिल्मी स्टाइल आव्हान दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की वाचा >> ‘राणे म्हणजे भोकं पडलेला फुगा, कितीही हवा भरली तरी…’; ‘सामना’मधून हल्लाबोल

नितेश राणे यांनी अभिनेता मनोज वाजपेयीवर चित्रित करण्यात आलेला एक व्हिडीओ पोस्ट केलाय. राजनिती या चित्रपटामधील आहे. व्हिडीओमध्ये मनोज वाजपेयी एका सभेला संबोधित करताना, “आसमान में थूकने वाले को शायद ये पता नही है की पलट कर थूक उन्ही के चेहरे पर गिरेगी,” असं म्हणताना दिसतो. तसेच पुढे तो, “करारा जवाब मिलेगा,” असंही म्हणतो. या व्हिडीओच्या माध्यमातून नितेश राणेंनी मंगळवारी राज्यामध्ये घडलेल्या नारायण राणे यांच्या अटक आणि सुटका प्रकरणावरुन विरोधकांना थेट आव्हान दिलं आहे. रात्री पाऊणच्या सुमारास नितेश यांनी हा व्हिडीओ शेअर केलाय.

दिल्ली भाजपाचे प्रवक्ते तेजिंदरपालसिंग बग्गा यांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना नारायण राणेंचा उल्लेख जखमी सिंह असा केलाय.

नक्की वाचा >> अटकेनंतर नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत म्हणाले…

मंगळवारी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास नारायण राणे यांना गोळवली येथील गोळवलकर गुरुजी स्मृती प्रकल्प येथून पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. ही कारवाई झाली त्यावेळी नारायण राणेंसोबत त्यांचे पुत्र निलेश राणेही होते.

नारायण राणे यांना त्यांच्याच गाडीत बसवून पोलीस रवाना झाले आहेत. यावेळी निलेश राणे आणि समर्थकांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांचा मोठा फौजफाटा तिथे तैनात होता. पोलीस राणेंना त्यांच्या गडीमध्ये बसवून नेत असतानाच राणेंचे पुत्र निलेश राणे हे गाडीच्या एका बाजूने आडवे येत गाडी पुढे जाण्यापासून अडवत होते. मात्र पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना बाजूला करत राणेंच्या गडीसमोरील मार्ग मोकळा केल्याचं पहायला मिळालं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitesh rane shared video clip of manoj bajpai challenging political opposition after narayan rane gets the bail scsg
First published on: 25-08-2021 at 08:29 IST