रत्नागिरी – तालुक्यातील पाली-पाथरट येथे गुरुवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पाली पाथरट मावळटवाडी येथे राहणाऱ्या इंदिरा शांताराम धाडवे (वय ७५) यांच्यावर दडी मारून बिबट्याने जीवघेणा हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यात इंदिरा धाडवे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर पाली येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याविषयी मिळालेल्या माहितीनुसार, इंदिरा धाडवे यांचा मुलगा सुभाष बाजूला चुलीजवळ पाणी तापवत बसला होता म्हणून त्या वाचल्या. त्याने तत्काळ पेटलेले लाकूड घेऊन धाव घेतल्याने बिबट्या पळून गेला. दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात इंदिरा धाडवे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना पाली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने मुलगा आणि इतर माणसे बाजूलाच असल्यामुळे इंदिरा धाडवे यांचा जीव वाचला.

child died in a leopard attack in Nandurbar district
नंदुरबार जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
caste panchayat investigates woman for love marriage with father in law in chhatrapati sambhajinagar
सासऱ्याच्या प्रेमविवाहाबद्दल महिलेला जातपंचायतीचा जाच
Wardha dead bodies reservoir, Wardha,
वर्धा : जलाशयात आढळले तीन मृतदेह, दोघांची ओळख पटली; पूरबळी संख्या सात
boy died leopard attack Junnar,
जुन्नरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
Chandrapur Sudhir mungantiwar marathi news
नागपूर : वन्यप्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांवर वनमंत्री म्हणतात, “उपाययोजना…”
online gambling, youth suicide Virar,
ऑनलाईन जुगारात कर्जबाजारी, गुजरातमधील तरुणाची विरारमध्ये आत्महत्या
Minor girl murder Jalgaon, girl murder torture,
जळगावमध्ये अल्पवयीन मुलीची अत्याचारानंतर हत्या

हेही वाचा – Sudhir Mungantiwar : “महाविकास आघाडी सरकारच्या काळात विद्यार्थ्यांचे प्रश्न गंभीर नव्हते का?”, सुधीर मुनगंटीवारांचा शरद पवारांवर हल्लाबोल

हेही वाचा – Badlapur School Case : “बदलापूरच्या घटनेनंतर माझा राजीनामा मागतायत, पण कोलकाता प्रकरणावर…”, फडणवीसांचा मविआवर हल्लाबोल

मागील दोन वर्षांपासून बिबट्याचा वावर या भागात आहे हे निदर्शनास आणूनसुद्धा वनविभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. या आधीही खानु गावात अशी घटना घडली होती. यामुळे जनमानसात खूप भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी लवकरात लवकर यावर उपाययोजना करण्यात यावी अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.