रायगड किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेल्या एका पर्यटकाचा डोक्यावर दगड पडल्याने मृत्यू झाला आहे. अजय प्रताप सिंग असे या पर्यटकाचे नाव आहे. मूळचा ग्वाल्हेर येथील असणारा हा तरुण पुण्यातील आयटी कंपनीत कामाला होता.
अजय पुण्याहून त्याच्या मित्रांसमवेत रायगड किल्ला पाहायला आला होता. किल्ला पाहून पाय-यांनी खाली उतरत असतांना कड्यावरून आलेला दगड त्याच्या डोक्यात पडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
संग्रहित लेख, दिनांक 26th Jun 2016 रोजी प्रकाशित
रायगडावर पर्यटनासाठी गेलेल्या तरुणाचा दगड पडून मृत्यू
हा तरुण पुण्यातील आयटी कंपनीत कामाला होता.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
First published on: 26-06-2016 at 14:09 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One tourist dead at raigad fort