scorecardresearch

पालघर : गोमांस तस्करी प्रकरणात अटक असलेला आरोपी फरार

पोलीस बंदोबस्त असतानाही करोना उपचार केंद्रातून फरार झाल्याने पोलिसांवरच प्रश्नचिन्ह

(प्रातिनिधिक छायाचित्र)

गोमांस तस्कर प्रकरणात मनोर पोलिसांच्या अटकेत असलेला आरोपी कडक पोलीस बंदोबस्त असतानाही फरार झाल्याची घटना आज पहाटे पालघर येथे घडली. या आरोपीला करोना झाल्याने त्याच्यावर पालघरच्या कोरोना उपचार केंद्रात उपचार सुरू होते. पहाटेच्या दरम्यान त्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढल्याचे समोर.

काही दिवसांपूर्वी मनोर पोलीस ठाणे हद्दीमध्ये गोमांस तस्करी प्रकरणी तीन आरोपी अटक केले होते. या तिन्ही आरोपीना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्यांना केळवे सागरी पोलीस ठाण्यात ठेवले होते. यातील एका आरोपीला करोनाबाधा झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पालघर शहरातील आरोग्य पथकाकडून करोना उपचार केंद्रांमध्ये पोलीस बंदोबस्तात त्याच्यावर उपचार सुरू होते.

दरम्यान, आज पहाटे या आरोपीने पोलिसांना गुंगारा देऊन पळ काढला. पोलिसांच्या निगराणी खाली असताना त्याने पळ काढला कसा? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. आरोपी निसटल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Palghar accused arrested in beef smuggling case absconding msr

ताज्या बातम्या