बीडच्या राजकारणात एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभ्या असलेल्या भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे या भावा-बहिणीचं राजकीय वैर सर्वश्रुत आहे. मात्र, सध्या बीडमधील सहकारी साखर कारखाना निवडणुकीत हे दोन्ही राजकीय विरोधक एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. याबाबत पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी स्पष्टपणे हो म्हणत त्यांची भूमिका मांडली. त्या गुरुवारी (१८ मे) टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.

लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेत (शिंदे गट) एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला अधिक जागा मिळणार या सर्वेक्षणावर पंकजा मुंडे म्हणाल्या, “मी कोणत्याही सर्व्हेवर काही टिपण्णी करणार नाही. दर दोन महिन्यांनी राजकीय परिस्थिती बदलत आहे. त्यामुळे हे सर्व्हे काळानुसार बदल असतात. आत्ता तरी आम्ही सकारात्मक उर्जेने इकडून निघतो आहोत.”

“बीडमध्ये साखर कारखाना निवडणुकीत धनंजय मुंडे आणि तुम्ही एकत्र येणार का?”

बीडमध्ये साखर कारखाना निवडणुकीत धनंजय मुंडे आणि तुम्ही एकत्र येणार का? या प्रश्नावर पंकजा मुंडे म्हणाल्या, “हो, धनंजय मुंडे आणि आम्ही कारखान्याच्या हितासाठी एकत्र पॅनल करून एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. आमचे पक्ष जरी वेगळे असले तरी सहकारी साखर कारखान्यात आम्ही एकत्र आहोत.”

हेही वाचा : “इतके राजकीय भूकंप झाले तर… मला महाराष्ट्राची काळजी वाटते आहे” पंकजा मुंडेंचं वक्तव्य चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“महाविकासआघाडी एकत्र राहिली तर तो भाजपाला पर्याय ठरू शकेल का?”

“महाविकासआघाडी एकत्र राहिली तर तो भाजपाला पर्याय ठरू शकेल का?” या प्रश्नावर पंकजा मुंडे म्हणाल्या, “महाविकासआघाडी एकत्रच आहे आणि आम्ही त्यांच्याविरोधातच लढत आहोत. तीच परिस्थिती मागील चार वर्षे महाराष्ट्रात आहे. त्यात नाविन्य काहीच नाही.”