परभणी जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत रामप्रसाद बोर्डीकर-सुरेश वरपुडकर यांच्या जय तुळजाभवानी शेतकरी विकास पॅनेलला १५पकी १२ जागा मिळाल्या. या पॅनेलचे ५ संचालक आधीच बिनविरोध निवडून आले. आता या पॅनेलच्या सर्व संचालकांची संख्या १७ झाली आहे. सुरेश देशमुख यांच्या नेतृत्वाखालील बँक बचाव पॅनेलला मतदारांनी साफ नाकारले. या पॅनेलमधील आमदार बाबाजानी दुर्राणी, लक्ष्मणराव गोळेगावकर, राजेश विटेकर हे तिघे निवडून आले. यातील विटेकर हे बोर्डीकर-वरपुडकर गटात सहभागी झाले. जिल्हा बँकेवर बोर्डीकरांनी आपला निर्वविाद ठसा उमटवला.
जिल्हा बँकेच्या २१ संचालक निवडीसाठी एप्रिलच्या सुरुवातीला निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. २१ पकी ६ संचालक पूर्वीच बिनविरोध निवडून आले. यात सुरेश देशमुख (परभणी), साहेबराव पाटील गोरेगावकर (सेनगाव), आमदार तानाजी मुटकुळे (िहगोली), सुरेश वडगावकर (कळमनुरी), अंबादास भोसले (वसमत) व गयबाराव नाईक (औंढा नागनाथ) यांचा समावेश आहे. उर्वरित १५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सोसायटी मतदारसंघातील ८ पकी ५ जागा वरपुडकर-बोर्डीकर, तर ३ जागा सुरेश देशमुख यांच्या पॅनेलला मिळाल्या. पणन व प्रक्रिया, बिगरशेती, अनुसूचित जाती जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, महिला राखीव, इतर मागासवर्गीय मतदारसंघातील सातही जागा वरपुडकर-बोर्डीकर यांच्या पॅनेलला मिळाल्या.
मतदारसंघनिहाय विजयी उमेदवार व कंसात त्यांना मिळालेली मते : पणन व प्रक्रिया मतदारसंघ – सुरेश वरपुडकर (४६ मते). बिगरशेती – विजय जामकर (५११), इतर व मागासवर्गीय राखीव – प्रभाकर वाघीकर (१ हजार ३), महिला राखीव – करुणाबाई कुंडगीर (१ हजार ११) व रूपाली पाटील (९४२ मते). अनुसूचित जाती-जमाती राखीव – वरपुडकर गटाच्या द्वारकाबाई कांबळे (१ हजार ३८). विमुक्त जाती भटक्या जमाती – माजी आमदार कुंडलीक नागरे (९३७). सोसायटी मतदारसंघ – पालममधून लक्ष्मणराव गोळेगावकर (२३), गंगाखेडमध्ये भगवान सानप (२६ मते), सोनपेठमध्ये जि.प. अध्यक्ष राजेश विटेकर (२३), पाथरीत आमदार बाबाजानी दुर्राणी (३० मते), मानवतमध्ये विद्यमान संचालक पंडितराव चोखट (३४ मते), सेलूमध्ये बोर्डीकर गटाचे हेमंत आडळकर (२८), पूर्णेमध्ये विद्यमान संचालक बालाजी देसाई (६७ मते).
जिंतूरमध्ये विरोधी उमेदवार भारत गबाळे व त्यांचे सूचक-अनुमोदक यांनी बोर्डीकरांना मतदान केल्याने त्यांना सर्व ५६ मते मिळाली. विरोधी मारोतराव पिसाळ यांना अवघी २ मते मिळाली. बँक निवडणुकीत वरपुडकर-बोर्डीकर यांनी एकहाती सत्ता घेतली. विरोधी सुरेश देशमुख यांच्या बँक बचाव पॅनेलचा धुव्वा उडाला. देशमुख यांच्या पॅनेलला २१ पकी केवळ ४ जागा मिळाल्या. या चारपकी ३ संचालक आमच्याशी संपर्क ठेवून आहेत, असा दावा बोर्डीकरांनी केला. देशमुख पॅनेलमधील विजयी उमेदवार विटेकर हेही बोर्डीकर-वरपुडकरांनी घेतलेल्या पत्रकार बठकीस उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 8th May 2015 रोजी प्रकाशित
परभणी जिल्हा बँक बोर्डीकर-वरपुडकरांकडे
परभणी जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत रामप्रसाद बोर्डीकर-सुरेश वरपुडकर यांच्या जय तुळजाभवानी शेतकरी विकास पॅनेलला १५पकी १२ जागा मिळाल्या. या पॅनेलचे ५ संचालक आधीच बिनविरोध निवडून आले.

First published on: 08-05-2015 at 01:40 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parbhani district bank to ramprasad bordikar suresh warpudkar