भारतात दसऱ्याला रावण दहनाची परंपरा आहे. देशभरात विविध ठिकाणी रावण दहनाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पण महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात पत्नीच्या छळाला कंटाळलेले काही पुरुष दसरा थोडया वेगळया पद्धतीने साजरा करतात. ही पुरुष मंडळी दसऱ्याला रावणाऐवजी त्याची बहिण शूर्पणखाचा पुतळा जाळतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशा प्रकारे दसरा साजरा करणारे हे पुरुष पत्नी पीडित संघटनेचे सदस्य आहेत. गुरुवारी औरंगाबाद जिल्ह्यातील कारोली गावात त्यांनी शूर्पणखाचा पुतळा जाळला. भारतातील सर्व कायदे पुरुषांच्या विरोधात आणि महिलांना प्राधान्य देणारे आहेत. छोटया छोटया मुद्यावरुन नवरा आणि त्याच्या कुटुंबियांचा छळ करण्यासाठी महिला कायद्यातील तरतुदींचा वापर करतात असे पत्नी पीडित संघटनेचे संस्थापक भारत फुलारे यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Patni pidit purush sanghatana burn surpanakha effigy on dussehra
First published on: 20-10-2018 at 13:52 IST