लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील पोलीसांची गस्त अधिक कडक करण्याचा निर्णय सांगलीत झालेल्या पोलीस अधिकार्‍यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. तसेच निवडणूक कालावधीत बँक खात्यावरून होणार्‍या मोठ्या आर्थिक व्यवहारावर बारकाईने लक्ष देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले आहेत.

lok sabha elections 2024 udayanraje bhosale declared bjp candidate from satara
साताऱ्याची जागा भाजपने बळकावली; राष्ट्रवादीला धक्का; ठाणे, रत्नागिरी, नाशिकचा तिढा कायम
29 Naxalites killed on Chhattisgarh-Maharashtra border
छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर तब्बल २९ नक्षलवाद्यांचा खात्मा, ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठी कारवाई
Ajit Pawar, sunetra pawar
दुभंगलेली मने जोडण्यावर अजित पवारांचा भर
In the first list of candidates announced by Sharad Pawar faction of NCP Nilesh Lanke from Nagar Lok Sabha Constituency has been included
शरद पवार-नीलेश लंके यांनी ठरवून केलेली खेळी की निव्वळ योग? राजीनामा आणि लगेचच उमेदवारीच्या पहिल्याच यादीत स्थान

जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत सीमेलगत असलेल्या विजयपूर, बेळगाव जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची बैठक गुरूवारी झाली. या बैठकीस विजयपूरचे अधिक्षक ऋषिकेश सोनवणे, विजयपूरचे उपविभागीय अधिकारी गिरीमा तलकट्टी, विजयपूर मंडल अधिकारी एच. डी. मुल्ला, अतिरिक्त अधिक्षक रितु खोखर, जतचे उप अधिक्षक सुनिल साळुंखे आणि सीमावर्ती पोलीस ठाण्याचे प्रभारी उपस्थित होते.

आणखी वाचा-दिल्लीपुढे झुकणार नाही! आजोबांच्या राष्ट्रवादीला ‘तुतारी’ चिन्ह मिळताच युगेंद्र पवार आक्रमक

या बैठकीमध्ये सीमेवरील तपासणी नाक्यावर अवैध मद्य, अंमली पदार्थ यांची वाहतूक आणि रोखड यांची कठोरपणे तपासणी करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करणे, गुन्ह्यातील हवे असलेल्या आरोपी, तडीपार गुन्हेगार, फरारी, कारागृहातून बाहेर आलेले संशयित यांच्याबाबत एकमेकांना माहिती देणे यावर चर्चा झाली.

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत बँकामार्फत होत असलेल्या मोठ्या आर्थिक व्यवहारावर लक्ष ठेवण्याची सूचना जिल्हाधिकारी यांनी दिली. प्राप्तीकर विभाग, पोलीस, बँक, जीएसटी, राज्य उत्पादन शुल्क आणि परिवहन विभागाने समन्वयाने काम करावे, भरारी पथके नियुक्त करावीत आणि अवैध व्यवहाराबाबत सतर्क राहावे अशा सूचना देण्यात आल्या.