गोंदिया : छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांच्या सीमेलगत असलेल्या नक्षलग्रस्त गोंदिया जिल्ह्यात दरडोई उत्पन्नात वाढ झाली असून आरोग्य सुविधांची प्रगतीही उल्लेखनीय स्वरूपाची आहे.

गोंदिया जिल्हा हा धानाचे कोठार म्हणून महाराष्ट्रात ओळखला जातो. येथे मोठ्या प्रमाणात धानाची शेती केली जाते. त्या अनुषंगाने शेती आणि त्याला पूरक व्यवसायाला लागणारे अवजारे, टॅक्टर ट्रॉली आदीशी संबंधित कारखाने येथे सुरू झाले. त्यातून रोजगार संधी आणि आर्थिक सधनता येऊ लागली. २०२१-२२ चे जिल्हा दरडोई उत्पन्न १,३७,३६२ रुपये होते. चालू किमतीनुसार जिल्ह्याचा स्थूल उत्पन्नाच्या २१.६ टक्के कृषी क्षेत्रातून, २०.२ टक्के, उद्याोग क्षेत्रातून व उर्वरित ५८.२ टक्के सेवा क्षेत्रातून प्राप्त झाले आहे. २००१ मध्ये जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न १६,०६३ रुपये, २०११ मध्ये ४६,८७८ रुपये, २०२० मध्ये १,२२,२२४ रुपये होते. मागील २० वर्षांत जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नात वाढ झाल्याचे दिसून येते. त्या अनुषंगाने शेती आणि पूरक तसेच शेती आधारित उद्याोग आणि सेवाक्षेत्रात ही वाढ झालेली आहे.

गोंदिया जिल्ह्यात मागील दोन वर्षांत वाढलेली लघुउद्याोगांची संख्या, रस्ते बांधणी आणि विमानसेवेमुळे दळणवळणांच्या साधनात झालेली सुधारणा यामुळे जिल्हा प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे. जिल्ह्यातून नक्षलवाद कायमचा हद्दपार व्हावा, या अनुषंगाने शासन पातळीवर यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. काही प्रमाणात त्याला यश येत आहे.

हेही वाचा >>> लघुउद्योगांची भरभराट

शिक्षण क्षेत्राबाबतीत जिल्ह्यात शासकीय तंत्रनिकेतन, बिरसी येथील विमानतळावर फ्लाइंग स्कूल येथे दरवर्षी वैमानिक तयार होण्याचे प्रशिक्षण दिले जाते. यासोबतच जिल्ह्यात कृषी विद्यालये, डी. फार्म, बी. फार्म विद्यालये आहेत. गोंदिया जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती समाधानकारक आहे.

उद्योग क्षेत्रात वाढ

जिल्ह्यात २०२२ मध्ये सूक्ष्म, लघु व मध्यम स्वरूपाचे १९८ कोटी रुपयांचे सहा प्रकल्प सुरू झाले. यातून ९४१ लोकांना रोजगार मिळाला. २०२३ मध्ये औद्याोगिक क्षेत्रातील गुंतवणुकीत वाढ होऊन ती ५०८ कोटीपर्यंत वाढली. १३४१ जणांना प्रत्यक्ष आणि तेवढ्याच लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळाला. सरकारी आकडेवारीनुसार जिल्ह्यात लघु आणि मध्यम स्वरूपाचे मिळून एकूण २२,८९९ उद्याोगांची नोंद आहे. त्याद्वारे एक लाखांवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्वरूपात रोजगार निर्मिती झालेली आहे.

आरोग्य क्षेत्रात प्रगती

गोंदिया जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्रात प्रगती झालेली दिसून येते. मागील पाच वर्षात येथे सुरू झालेला शासकीय वैद्याकीय महाविद्यालय असो, किंवा गोंदिया जिल्ह्यातील नव्याने सुरू झालेले आरोग्यवर्धिनी केंद्र असो त्याचा नागरिकांना फायदा झाला आहे. जिल्ह्यात एकूण ४५ प्राथमिक आरोग्य केंद्रे, १० ग्रामीण रुग्णालये. एक उपजिल्हा रुग्णालय, २५८ आरोग्य उपकेंद्रे तर शहरी क्षेत्रात १ जिल्हा रुग्णालय, १ स्त्री रुग्णालय आणि एक शासकीय वैद्याकीय महाविद्यालय आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.