राहाता : किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ५ लाख ४९ हजार शेतकरी यांच्या खात्यात १०९ कोटी रुपये वर्ग झाले आहेत. या योजनेमुळे शेतकरी यांना मोठा आधार मिळत असून, योजनेमध्ये सातत्य राखणे हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचे यश असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले.

केंद्र सरकारच्या किसान सन्मान योजनेचा २० वा हप्ता शेतकरी यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे. शेतकरी यांच्यासाठी सुरू केलेली ही एक ऐतिहासिक योजना ठरली आहे. वर्षाला ६ हजार रुपये थेट बँक खात्यात वर्ग होत असल्याने या योजनेचा मोठा दिलासा शेतकरी यांना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील ५ लाख ४९ हजार ५१९ शेतकरी यांच्या खात्यात प्रत्येकी २ हजार रुपयांप्रमाणे १०९ कोटी ९० लाख रुपये जमा झाले असल्याचे सांगून विखे म्हणाले की, सद्य परिस्थितीत पेरणीची कामे सुरू असताना अल्पभूधारक शेतकरी यांच्यासाठी ही योजना दिलासा देणारी ठरते. यापूर्वी १९ हप्ते शेतकरी यांच्या खात्यात जमा झाले आहेत. केंद्र सरकारने शेतकरी यांच्यासाठी सुरू केलेल्या अनेक योजनांपैकी किसान सन्मान योजना ही महत्त्वपूर्ण ठरली असून, योजनांच्या अंमलबजावणीत केंद्र सरकार सातत्य राखून आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अकोले तालुक्यातील ३४ हजार ९४८ शेतकरी यांना ६ कोटी ९९ लाख, जामखेड २९ हजार ५८ शेतकरी यांना ५ कोटी ८१ लाख, कर्जत ४३ हजार ६१० शेतकरी यांना ८ कोटी ७२ लाख, कोपरगाव २९ हजार ६४० शेतकरी यांना ५ कोटी ९३ लाख, अहिल्यानगर ३१ हजार २० शेतकरी यांना ६ कोटी २० लाख, नेवासा ५४ हजार २८९ शेतकरी यांना १० कोटी ८६ लाख, पारनेर ५० हजार ३८३ शेतकरी यांना १० कोटी ८ लाख, पाथर्डी ३९ हजार ९५५ शेतकरी यांना ७ कोटी ९९ लाख, राहाता २४ हजार १०८ शेतकरी यांना ४ कोटी ८२ लाख, राहुरी ३८ हजार ५६३ शेतकरी यांना ७ कोटी ७१ लाख, संगमनेर ५९ हजार १२८ शेतकरी यांना ११ कोटी ८३ लाख, शेवगाव ४१ हजार ९०१ शेतकरी यांना ८ कोटी ३८ लाख, श्रीगोंदा ५० हजार ५७१ शेतकरी यांना १० कोटी ११ लाख, श्रीरामपूर २२ हजार ३४३ शेतकरी यांना ४ कोटी ४७ लाख रुपये, अशा रकमा तालुकानिहाय शेतकरी यांच्या खात्यात वर्ग झाल्याचे त्यांनी सांगितले.