राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना करोनाची लागण (Sharad Pawar Tested Corona Positive) झाली आहे. शरद पवार यांनी ट्वीट करत आपल्याला करोना संसर्ग झाल्याची माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांनी खबरदारी घ्यावी आणि चाचणी करुन घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. दरम्यान शरद पवारांना करोनाची लागण झाली असल्याची माहिती मिळताच सर्व पक्षातील राजकीय नेत्यांनी त्यांची चौकशी करत लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

शरद पवार ट्वीटमध्ये काय म्हणाले –

“माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पण काळजीचं काही कारण नाही. मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. मी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती करतो की त्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी आणि खबरदारी घ्यावी,” असं पवार यांनी २४ जानेवारी २०२२ रोजी दुपारी दोन वाजून पाच मिनिटांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Sharad Pawar Corona Positive: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना करोनाची लागण

पवारांनी केलेल्या ट्विटनंतर अनेक बड्या नेत्यांनी त्यांना करोनावर मात करुन लवकर बरं होण्यासाठी शरद पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींबरोबरच काँग्रेसचे महाराष्ट्रामधील प्रमुख नेते बाळासाहेब थोरात यांच्याबरोबरच इतरही नेत्यांचा समावेश आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील फोन करुन शरद पवारांची चौकशी केली आहे. शरद पवारांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोन करुन माझ्या प्रकृतीची चौकशी केली. त्यांनी दाखवलेली काळजी आणि शुभेच्छांसाठी मी आभारी आहे,” असं शरद पवार ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

८१ वर्षीय शरद पवार यांनी करोनाची पहिली लस १ मार्च २०२१ रोजी घेतली होती त्यानंतर ७ मार्च २०२१ रोजी त्यांनी करोना प्रातिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला होता.