सोलापूर : मोहोळ तालुक्यात झालेला बालविवाह आणि त्यात गर्भवती झालेल्या बालिकेची माहिती डॉक्टरच्या सतर्कतेमुळे उजेडात आली. याप्रकरणी तिचे लग्न लावून देणा-या भटजीसह सहाजणांविरूध्द मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पीडित बालिका टीटी इंजेक्शन घेण्यासाठी मोहोळ येथील ग्रामीण रूग्णालयात आली होती. तिच्यासोबत तिचा पती आणि सासू आली होती.

हेही वाचा >>> VIDEO : भाजपा विधानसभा प्रमुखाला भाजपाच्याच कार्यकर्त्यांकडून लोखंडी रॉडने मारहाण, पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉक्टरला पीडित बालिकेच्या वयाबाबत संशय वाटल्याने त्यांनी तिचे आधारकार्ड घेऊन त्यावरील तिची जन्मतारीख पाहिली. तेव्हा पीडित बालिका अल्पवयीन असून शिवाय गर्भवतीही असल्याचे निदर्शनास आले. तेव्हा डॉक्टरने वेळीच सतर्कता बाळगत स्थानिक पोलिसांना याबाबतची माहिती कळविली. दरम्यान, मोहोळ पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक अंजना फाळके यांनी रूग्णालयात धाव घेऊन पीडित बालिकेला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने आपले लग्न लहान वयात लावून दिल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी या घटनेची माहिती सोलापूरच्या महिला व बालविकास समितीला कळविताच महिला व बालविकास अधिकारी अमृत सरडे यांनी मोहोळमध्ये घटनेची पडताळणी करीत मोहोळ पोलीस ठाण्यात संबंधितांविरूध्दा फिर्याद नोंदविली. यात पीडित बालिकेचा पती, सासू-सासरे, आई-वडील आणि लग्न लावून देणा-या भटजीला आरोपी करण्यात आले आहे.