सोशल मीडियावर पोर्नोग्राफीचे व्हिडिओ फॉरवर्ड करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्याकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी गुरुवारी सांगितले की, ४ एप्रिल रोजी रात्री साडे अकरा वाजता शारीरिक संबंधाची पॉर्न व्हिडिओ फेसबुक मेसेंजर या समाज माध्यमाद्वारे अपलोड करण्यात आला होता. याचा शोध घेतल्यानंतर हा व्हिडीओ गडहिंगल्ज येथील ज्या व्यक्तीच्या फेसबुक अकाउंट वरून पाठवण्यात आल्याचे दिसले दिसून आले. त्यानुसार त्याच्यावर ‘माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६७ व ६७- अ’ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्याला गुरुवारी न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
तसेच, शेळकेवाडी (ता. करवीर) येथून बालकांचे अनैसर्गिक क्रियेचे चित्रीकरण असलेला व्हिडिओ ज्या युजरने त्याच्या फेसबुक मेसेंजर वरून अपलोड केला होता त्यालाही मोबाईल क्रमांकाच्या आधारे शोधण्यात आले आणि अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याचा मोबाईल वर सिम कार्ड जप्त केले आहे.