नागपूर येथील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अरविंद बनसोड यांनी आत्महत्या केल्याची घटना मागील महिन्यात घडली. या घटनेप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक आरोप केला आहे. “अरविंद बनसोडेचा मृत्यू संशयास्पद असताना पोलिसांकडून मृत्यूचा योग्य तपास न करता मृत्यूस आत्महत्या म्हणून नोंद करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी आरोपी मिथिलेश उमरकरला वाचवण्यासाठी हे प्रकरण दाबण्यात येतंय,” असा आरोप आंबेडकर यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अरविंद बनसोड यांचा २७ मे रोजी मृत्यू झाला. अरविंद बनसोडे हे नागपूर शहरातील थडीपवनी येथील गॅस एजन्सीच्या पायऱ्यांवर बनसोड बेशुद्धावस्थेत आढळून आले होते. यावेळी त्यांच्या बाजूला किटकनाशकाची बाटलीही आढळून आली होती. या प्रकरणी पोलिसांनी आत्महत्या केल्याची नोंद केली आहे. मात्र, ही आत्महत्या नसल्याचं म्हटलं आहे. अरविंद बनसोड यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचं सांगत पोलिसांनी चौकशी करण्याची मागणी केली आहे.

यासंदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट केलं आहे. “नागपूर येथील ‘वंचित’चे कार्यकर्ते अरविंद बनसोडचा मृत्यू संशयास्पद असताना पोलिसांकडून मृत्यूचा योग्य तपास न करता मृत्यूस आत्महत्या म्हणून नोंद करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी आरोपी मिथिलेश उमरकरला वाचवण्यासाठी हे प्रकरण दाबण्यात येतंय. आरोपीचे वडील बंडोपंत उमरकर राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष आहेत. तर आरोपी राष्ट्रवादीचा पंचायत समिती सदस्य आहे. तसेच मिथिलेश राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांचा निकटवर्तीय असल्याचे समजते.

या प्रकरणात किरकोळ ३०६, ३४ कलमातंर्तग कार्यवाही करण्यात आलीय. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात त्वरित लक्ष देऊन मागण्या मान्य कराव्यात. मी स्वतः नागपूर पोलीस अधीक्षकांना विनंती केली की तपास दुसऱ्या अधिकाऱ्याकडे द्यावा. याला त्यांनी होकार दिला आहे. पीडितांच्या पाठिशी आम्ही आहोत,” असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash ambedkar allegations on ncp activist bmh
First published on: 06-06-2020 at 14:08 IST