लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : नरेंद्र मोदी सरकारच्या चुकीच्या आरक्षण धोरणामुळे सन २०१७ पासून इतर मागासवर्गाचे ११ हजार विद्याार्थी वैद्याकीय प्रवेशापासून वंचित राहिले. केंद्र सरकारने नीटला हाताशी धरत ‘कट ऑफ’ मध्ये बदल घडवून ओबीसींचे आरक्षण संपवण्याचा डाव रचला आहे, असा घणाघाती आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी येथे केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अकोला येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्र सरकारने ओबीसींसाठी राखीव असलेल्या वैद्याकीय जागेवर या प्रवर्गातील विद्यााथ्र्यांना प्रवेश दिला नाही. या धोरणामुळे २०१७ पासून ते आजपर्यंत ११ हजार विद्यााथ्र्यांना फटका बसला. देश पातळीवरील ‘ऑल इंडिया फेडरेशन ऑफ ऑधर बॅकवर्ड क्लासेस’नी ही आकडेवारी जाहीर केली. ‘नीट’द्वारे प्रवेशामध्ये ओबीसींचे २७ टक्के आरक्षण दिले नाही. भारतीय राज्यघटनेच्या ९३ व्या दुरूस्तीनुसार केंद्र शासनाने ओबीसींना २७ टक्के आरक्षण देणे आवश्यक आहे. मात्र, नीटमार्फत होत असलेल्या प्रवेश प्रक्रियेमध्ये ओबीसींचे आवश्यक आरक्षण २०१७ पासून कमी केले आहे. त्यामुळे ओबीसी प्रवर्गातील सर्वसामान्य विद्याार्थी वंचित राहिले आहेत, असे अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

आरक्षणासंदर्भात देशात मारामारी असून त्यासाठी वारंवार लढा द्याावा लागतो. ओबीसी विद्यााथ्र्यांना डावलून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन झाले. ओबीसी हिंदू आहेत. केंद्रात ओबीसींचे सरकार, तर राज्यात काँग्रेस, राकाँ व हिंदुत्ववादी शिवसेनेची सत्ता आहे. तरीही ओबीसींवर हिंदूकडूनच अत्याचार होत असल्याची टीका करून मोदी सरकार आरक्षण विरोधी असल्याचा आरोप त्यांनी केला.
शासनाने निर्णय मागे घ्यावा, अन्यथा करोनाला न मानता वंचित आघाडीच्या झेंड्याखाली ओबीसी विद्याार्थी तीव्र आंदोलन छेडणार आहेत, असे ते म्हणाले. असंवैधानिक आदेश असल्याने आंदोलनातून विरोध करू, काँग्रेसनेही आंदोलन करावे, असे आवाहन त्यांनी केले. आंदोलनाचे स्वरूप व वेळेची माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. यावेळी प्रदेश प्रवक्ते डॉ.धैर्यवर्धन पुंडकर, प्रदीप वानखडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

चीनसंदर्भात देशाची दिशाभूल
चीनसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाची दिशाभूल करीत आहेत, असा हल्लाबोल अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केला. उद्भवलेल्या परिस्थितीवर भाष्य करता ते म्हणाले, चीनचे सैन्य आतमध्ये किती आले हे सरकारने सांगावे, चीनचे सैन्य दोन किमी मागे सरकल्याचे आज सांगण्यात आले. हे सर्व फसवे काम सुरू असल्याचा टोला त्यांनी लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash ambedkar alleges modi government planned to end obc reservation scj
First published on: 06-07-2020 at 20:50 IST