पाण्याच्या भांड्याला हात लावल्यावरून राजस्थानमध्ये इंद्रकुमार मेघवाल या दलित विद्यार्थ्याला शिक्षकाने मारहाण केली होती. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणावरून वंजित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी संताप व्यक्त केला आहे. आपण स्वांतत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आहे. मात्र, दलितांना अद्यापही हिंचारापासून मुक्ती मिळालेली नाही, ही अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा – “दरवाजे अद्यापही खुले आहेत, पण…”, आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांसमोर ठेवली अट; म्हणाले “त्यांचा गेम केला”

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

आपण स्वांतत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आहे. मात्र, दलितांना अद्यापही हिंचारापासून मुक्ती मिळालेली नाही, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. याच हिंसाचारातून राजस्थानमध्ये एका पालकाने आपले मुल गमावले आहे. हे कोणत्या स्वातंत्र्याचा सण साजरा करतील, हे सर्वच राजकीय पक्षांनी सांगितले पाहिजे? असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी विचारला आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी, तसचे इंद्रकुमार मेघवाल यांच्या नातेवाईकांना ५० लाखांची मदत आणि कुटुंबातील एका सरकारी नोकरी द्यावी, अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा दलितांच्या रक्ताने रंगला होता, असा इतिहास यापुढे लिहिला जाणार आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – ‘राष्ट्रवादीचा मोठा नेता जेलमध्ये जाणार’ म्हणणाऱ्या मोहित कंबोज यांना मिटकरींचा टोला, म्हणाले “कोणाच्या चड्डीचा नाडा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमकं काय आहे प्रकरण?

राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील सायला पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या सुराणा गावात इंद्रकुमार मेघवाल या दलित विद्यार्थ्याने पाण्याच्या भांड्याला हात लावण्याने शिक्षकाने त्याला मारहाण केली होती. गेल्या २४ दिवसांपासून त्याच्यावर अहमदाबामध्ये उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.