पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून विधानसभेची कराड दक्षिण की लोकसभेची सातारा पोटनिवडणूक लढवायची या संदर्भातील निर्णय दोनच दिवसांत होईल, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.

रविवारी कराड येथे कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. त्यात कार्यकर्त्यांनी  कराड दक्षिणच बरे’ असा सूर लावला. तर, पृथ्वीराजबाबांनी आपण कराडचा मतदार केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

लोकसभेच्या सातारा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांना आव्हान देण्यासाठी काँग्रेस मित्रपक्षांच्या आघाडीमधून माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव संभाव्य उमेदवार म्हणून आघाडीवर आहे.