कोल्हापूरात गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी शासन यंत्रणा गतिमान झाल्या आहेत. या विरोधात शासकीय मुलकीपड संघर्ष समितीच्या आंदोलनादरम्यान जिवंतपणी चिता पेटवून घेण्याचा प्रयत्न शुक्रवारी प्रांत कार्यालयासमोर करण्यात आला. यावेळी आंदोलकाला पोलिसांनी वेळीच रोखल्याने पुढील दुर्घटना टळली.

हेही वाचा- उद्धव ठाकरेंचा महाराष्ट्र बंदचा इशारा, नवनीत राणा म्हणाल्या, “राज्यपालांना हटवण्यासाठी पंतप्रधान मोदी…”

कोल्हापूरातील गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढून घेणेबाबत उच्च न्यायालयाने शासनाला आदेश दिला आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणा गतिमान झाली आहे. याविरोधात शासकीय मुलकीपड संघर्ष समितीच्यावतीनं गेली तीन दिवस प्रांत कार्यालयासमोर संसार मांडून आंदोलन सुरु केले आहे. आज जनसुराज्य शक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शंकर कांबळे यांनी प्रांत कार्यालयासमोर चिता रचून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. लोकप्रतिनिधी अतिक्रमण काढणेबाबत स्थगिती देत नाहीत, तोपर्यंत चिते वरून उठणार नाही अशी शंकर कांबळे यांनी मागणी केली. यावेळी आंदोलकांनी प्रांत कार्यालयासमोर रास्ता रोको आणि शंखनादही केला.