बिपीन देशपांडे/ पूनम सकपाळ, लोकसत्ता

छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई : सर्वच समाजघटकांच्या जेवणातला अविभाज्य भाग असलेली तूरडाळ क्विंटलमागे अडीच ते तीन हजारांनी महागली आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आवक घटल्याने तूर आणि उडीद डाळीने किलोमागे शंभरी गाठली आहे. खरिपातील पेरणी आणि डिसेंबपर्यंत होणारी आवक यांच्यातील पाच ते सहा महिन्यांचा कालावधी पाहता तूरडाळ मोठय़ा प्रमाणात आयात करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.

Potholes on Mangalwar Bazar flyover road in nagpur
उदंड झाली वाहने अन् रस्त्यावर खड्डेच खड्डे! उपराजधानीतील सदर मंगळवारी बाजार उड्डाणपुलावर…
Farmer's Anger, Unmet Demands, Kishore Tiwari, Impact Mahayuti, Maharashtra, lok sabha elections, lok sabha 2024, election 2024, yavatmal news, marathi news, politics news,
कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाचा महायुतीला फटका, किशोर तिवारींचा दावा,’ ३० जागांवर…’
akola unseasonal rain marathi news
अकोल्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा तडाखा; चार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान; ५५ घरांची पडझड
amravati orange producer farmers marathi news
गुढीपाडव्याची पहाट संत्री उत्पादकांसाठी ठरली भयावह; गारपिटीमुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज

गेल्या सहा महिन्यांत तूरडाळीच्या दरात ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. डिसेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या तीन महिन्यांच्या कालावधीत तूरडाळ घाऊक बाजारात ९० रुपये किलोपर्यंत होती. मार्चमध्ये दर १०५ रुपये तर, एप्रिलमध्ये ११२ रुपये किलोपर्यंत होता. आता काही ठिकाणी १४० रुपयांपर्यंत दर पोहोचला आहे.

राज्यातील अन्य बाजारांबरोबरच नवी मुंबईतील ‘एपीएमसी’ बाजारातही तुरीची आवक घटली आहे. या बाजारात राज्याच्या विविध भागांबरोबरच गुजरात आणि मध्य प्रदेशमधून डाळींची आवक होते. मात्र, डाळींची आवक घटल्याने फेब्रुवारीपासून डाळींची दरवाढ होण्यास सुरुवात झाली. या घाऊक बाजारात तूरडाळ ११५ रुपयांवर गेली आहे. उडीद डाळ ९५ रुपयांवरून १०१ रुपयांवर पोहोचली असून, मुगडाळही १०० रुपयांच्या उंबरठय़ावर आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांत तुरीचे उत्पादन मोठय़ा क्षेत्रावर घेतले जाते. महाराष्ट्रात १२ ते १३ लाख हेक्टर तुरीचे क्षेत्र आहे. गतवर्षी पावसाळा बराच लांबला होता. त्यात तुरीवर बुरशीजन्य रोगही पडले होते. परिणामी हेक्टरी उत्पादन घटल्याचे बदनापूर येथील तूर संशोधन केंद्रातील प्रभारी अधिकारी डॉ. दीपक खंडेराव पाटील यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. नोव्हेंबर-डिसेंबरमध्येही पाऊस अधून-मधून बरसत होता. काढणी सुरू असतानाही पाऊस आल्याने अनेक भागांत तुरीच्या शेंगांना जागेवरच कोंब फुटले होते. त्यामुळे उताऱ्यात घट झाली आणि बाजारपेठेत आवक अपेक्षेनुसार होत नसल्याने दरवाढ झाली. त्यामुळे पुढील चार ते पाच महिने गरज भागवण्यासाठी तूरडाळ मोठय़ा प्रमाणात आयात करण्याची वेळ येऊ शकते.

दरवाढ अशी..

घाऊक बाजारात तूरडाळ ११५ ते १४० रुपयांवर पोहोचली आहे. मूगडाळ डिसेंबरमध्ये ८० रुपये किलो होती. आता ही डाळ ९८ ते १२० रुपये किलोवर पोहोचली आहे. उडीद डाळीचीही दरवाढ झाली आहे. मसूर व हरभरा डाळीचे दर सध्या स्थिर आहेत. मटकीचेही दर दर्जानुसार, १०० ते १४० रुपयांपर्यंत आहेत.

केंद्र सरकारची साठय़ावर मर्यादा

पुणे : महागाई नियंत्रणाबरोबरच काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी केंद्र सरकारने तूर, उडीद डाळीच्या साठय़ावर मर्यादा घातली आहे. ही साठा मर्यादा ३१ ऑक्टोबपर्यंत लागू असेल. या शिवाय तेलाचे दर प्रतिलिटर आठ ते बारा रुपयांनी कमी करण्याचा आदेशही केंद्र सरकारने कंपन्यांना दिला आहे.

एपीएमसी धान्य बाजारात फेब्रुवारीपासून कडधान्याच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली. यंदा अवकाळी पावसाचा फटका डाळींच्या उत्पादनाला बसल्यामुळे बाजारात आवक कमी होत आहे. त्यामुळे डाळींच्या दरात वाढ होत आहे. -नीलेश वीरा, संचालक, अन्न धान्य बाजार समिती, नवी मुंबई</strong>