अनाथांची माय! असं ज्यांना कायम म्हटलं गेलं त्या सिंधुताई सपकाळ यांनी त्यांच्या आयुष्यात आलेल्या सगळ्यांनाच मायेची सावली दिली. ४ जानेवारी २०२२ या दिवशी त्यांनी जगाचा निरोप घेतला. माई म्हणून त्या महाराष्ट्रात प्रसिद्ध झाल्या. त्यांचं कार्य आकाशाइतकं मोठं होतं. त्यांच्यानंतर त्यांचा वारसा त्यांच्या कन्या ममता सपकाळ चालवत आहेत. ममता सपकाळ यांनी आई सिंधुताई सपकाळ यांच्यासाठी लिहिलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

काय आहे ममता सपकाळ यांची पोस्ट

खरंतर आम्ही सगळ्यांनी आधीच ठरवलं होतं की यावेळी स्टाफपैकी कुणी काहीही न करता “शिवजयंती” ची सगळी जबाबदारी मुलांकडेच द्यायची आणि यावेळी कार्यक्रमाचं नियोजन फक्त मुलांनीच करायचं. मुलांसमोर हा विचार मांडल्यानंतर मुलं अगदी आनंदाने तयार झाली आणि तयारीला लागली सुद्धा. काहीही नाही करायचं म्हटलं तरी आम्ही सगळेच मुलांच्या तयारीवर आम्ही नजर ठेवून होतोच पण मुलांनी मात्र “गरज पडू शकते” ही शक्यता ठेवलीच नाही. दिवसभर गडबड सुरू होती. झेंडे पताका फुगे सगळं आणून ठेवलं गेलं. उत्सव कमिटी मध्ये असलेल्या मुलांनी आपापली जबाबदारी वाटून घेतली असल्याने आज सकाळपासूनच कामामधली संपूर्ण सुसूत्रता दिसून येत होती. आणि एकदाचा कार्यक्रम सुरू झाला.

ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”
MLA Ram Satpute criticizes Sushilkumar Shinde on the issue of Hindutva
“…म्हणूनच सुशीलकुमारांच्या मुखातून हिंदू दहशतवाद शब्द निघाला”, आमदार राम सातपुते यांचे टीकास्त्र
instead of Kripal Tumane Raju Parve got Candidacy from Ramtek
शिंदेसोबत जाण्याच्या निर्णयाने तुमानेंची अवस्था ‘तेलही गेले अन् …’
Sharmila Pawar
अजित पवारांच्या सख्ख्या वहिनी आता सुप्रिया सुळेंच्या प्रचारात; म्हणाल्या, “आपल्या माहेरवाशिणीला…”

सगळ्यात आधी शिवगर्जना केली ती आमच्या माधवने. छातीवर हात ठेवून प्रतिज्ञा करावी आणि अचानक देहातलं लाल रंग भगव्या रंगात रूपांतरित होऊन अंगावर सरसरून काटा यावा असाच क्षण होता तो. नंतर पाठोपाठ सुरू झाली ती कार्यक्रमाची मालिकाच. मग त्यात नृत्य, भाषण,गाणे, पोवाडा, भारुड एकामागोमाग सादर होत गेले आणि आम्ही सगळेच भान हरपून फक्त बघत राहिलो. सलग एक तास खंड न पडता डोळे भरून येत होते.. वाहुन जात होते. हे एवढं सगळं यांनी कधी ठरवलं.. तयारी कधी केली.. हा आत्मविश्वास कुठून आला.. काही कळत नव्हतं पण आम्ही ठरवलं तर आम्ही काही करू शकतो हे आमच्या या छोट्या मावळ्यांनी आज दाखवून दिलं.

माझ्यासाठी म्हणाल तर हे एखाद्या पूर्ण होणाऱ्या स्वप्नासारखं होत आणि त्यासाठी मला वेदिका तुझे खूप खूप आभार मानायला हवेत. तिला सोबत करणारे सगळे हात आज अभिनंदनास आणि कौतुकास पात्र आहेत यात शंका नाही. दिनेश आणि प्रतिभा तुम्ही दोघेही आता या संस्थेचा अविभाज्य भाग आहात. कार्यक्रमाला तुमची आजची उपस्थिती मुलांचा उत्साह वाढवणारी होती.

हे पण वाचा सिंधुताई सपकाळांचा वारस होण्‍याचा खासगी सचिवाचा प्रयत्‍न; सिंधुताईंचे पुत्र अरूण सपकाळ यांचा आक्षेप

प्रताप, सागर, बालाजी, विद्या, श्वेता,कल्पना, राजू भाऊ, सुरेश भाऊ, रवी, यशोदा, नलिनी, शीतल, सुरेखा ताई, गोविंदा खरंच कुणकुणाची नावं घ्यावी कळत नाहीये. मनीषा आणि दिनेशने व्यक्त केलेल्या मनोगतात एक एक शब्द जणू माझाच होता याबाबत दुमत नाही.

सीमा, आज मुलांचं कौतुक करायचं म्हटलं तरी आपले शब्द संपले होते आणि यासाठी आपण आता स्पेशल वेगळा प्रोग्राम घेणार आहोत हे नक्की.!.. ( आणि हो.. एक सांगायचं राहिलंच. शिवजयंती दिवशी जेवणाचा मेन्यू महाराष्ट्रीयन मेन्यू अगदी पिठलं भाकरी ठेचा हाच हवा ही मुलांची फर्माईश पण आज पुरी केली. त्यातही पिठलं ताईनेच बनवावं हा आवर्जून केलेला हट्ट ही.
मम्मा.. बघते आहेस ना.!..