पुण्यातल्या शिवाजी नगर जंबो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात राजीव साळुंखेला अटक करण्यात आली आहे अशी माहिती भाजपाचे नेते किरीट सोमय्यांनी दिली आहे. या जंबो कोव्हिड सेंटर घोटाळा प्रकरणात राजीव साळुंखे हे संजय राऊत आणि सुजीत पाटकर यांचे पार्टनर आहेत.

काय म्हटलं आहे किरीट सोमय्यांनी?

पुणे शिवाजीनगर जंबो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात राजीव साळुंखेला अटक करण्यात आली आहे. आता संजय राऊत यांचे आणखी तीन पार्टनर्स सुजीत पाटकर, डॉ. हेमंत गुप्ता आणि संजय शहा या तिघांना अटक होणं बाकी आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना यांच्या बोगस कंपनीला जंबो कोविड सेंटरचं कंत्राट दिलं गेलं होतं. त्यामध्ये तीन रूग्णांचा मृत्यू झाला. आता या प्रकरणात कारवाई तर होणारच असा इशाराही किरीट सोमय्यांनी दिला आहे.

खासदार संजय राऊत यांचे पार्टनर सुजित पाटकर यांना अटक करा, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यापूर्वीही केली आहे. डॉ हेमंत गुप्ता, संजय शहा आणि सुजित पाटकर हे अद्याप फरार असून त्यांना अटक करा अशी सोमय्या यांनी मागणी केली आहे. राजीव साळुंखे हे सुजित पाटकर हे लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस चे भागीदार आहेत. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात साळुंखे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सुजित पाटकर आणि लाईफ लाईन कंपनीचा विरुद्ध मुंबई पोलिसांनी या आधीच गुन्हा दाखल केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यांची कंपनी ब्लॅक लिस्टमध्ये केल्यानंतरही संबंधित कंपनीविरोधात तत्कालीन सरकारने कोणत्याही प्रकराचा फौजदारी गुन्हा दाखल केला नाही. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनीदेखील वरळी मतदारसंघात लाइफ लाइन कंपनीला काम दिले. ब्लॉक लिस्ट झालेल्या कंपनीला पून्हा काम कसं दिलं जातं, असा प्रश्न किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. पाटकर यांच्या लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट कंपनीनं बोगस कागदपत्रं दाखवून खोट्या पद्धतीनं कोविड सेंटरचं कंत्राट मिळवल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय.