पुण्यात अभियंता असलेल्या तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. घरातील दिवाणावर खिडकीला ही तरुणी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. तृप्ती धिल्लोड असे तिचे नाव असून घरात कोणीच नसताना ही घटना घडल्याचे तिच्या शेजारी राहणाऱ्यांनी सांगितले. सॉफ्टवेअर अभियंता असलेली ही तरुणी दोन दिवसांपूर्वीच पुण्यातील विप्रो या नामांकित कंपनीत रुजू झाली होती. त्यानंतर अचानक ही घटना घडल्याने तिच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे. या तरुणीच्या वडिलांना हृदयविकाराचा त्रास झाल्याने तिचे कुटुंबिय उपचारासाठी रुग्णालयात गेले होते, त्यावेळी ही घटना घडली. त्यामुळे घटना घडली तेव्हा तृप्ती घरात एकटीच होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तरुणीच्या कुटुंबियांनी तिला बराच वेळ मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी शेजाऱ्यांशी संपर्क केला. त्यावेळी शेजारी देहूरोड येथील घरी गेले असता त्यांना ती मृतावस्थेत आढळली. शेजाऱ्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधून घडलेली घटना कळवली. पोलिस पुढील तपास करत असून तिच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नसल्याचे सांगण्यात आले आहे. या तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून त्याचा अहवाल आल्यानंतरच नेमके कारण स्पष्ट होईल.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune software engineer girl death mystery
First published on: 10-10-2018 at 13:52 IST