राहाता : ममदापूर येथील कत्तलखान्यावर लोणी पोलिसांनी आज, शुक्रवारी पुन्हा छापा टाकून ७०० किलो गोमांस, ४ गोवंशीय जनावरे असा एकूण २ लाख ६० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

कुरेशी मोहल्लातील शोयेब व यासीन शेख यांच्या घरामागील शेडमध्ये पोलिसांनी छापा टाकला. आरोपी शोयेब यासीन कुरेशी (वय २८), अब्दुल रहेमान यासीन शेख (वय ३०), अब्दुल करीम कुरेशी, मुनीर आमीर कुरेशी, शाकीब रज्जाक कुरेशी, साजीद युनीस कुरेशी, बकर उर्फ गोट्या राजु शेख (सर्व रा. कुरेशी मोहल्ला) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत १ लाख ४० हजार रुपये किंमतीचे गोमांस, १ लाख २० हजार रुपये किमतीची गोवंशीय जनावरे जप्त करण्यात आली. पोलिस हवालदार कल्याण काळे यांनी फिर्याद दिली आहे. सहायक पोलिस निरीक्षक कैलास वाघ, पोलिस उपनिरीक्षक आशिष चौधरी, बाबासाहेब सांगळे,, सहायक फौजदार सुरेश पवार, जॉन साळवी, कल्याण काळे यांच्या पथकाने कारवाई केली.

दहा दिवसांपूर्वीच या कत्तलखान्यावर पोलिसांनी छापा टाकला होता. कारवाई होऊनही कत्तलखाना बंद होत नसल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.