पक्षांतर बंदी झाली की नाही, हा निर्णय आदित्य ठाकरे घ्यायचा नाही. तर, हा निर्णय विधानसभा अध्यक्षांना घ्यायचा आहे, असा टोला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार आदित्य ठाकरे यांना लगावला आहे. विधिमंडळात संख्याबळ नसेल, तरच सरकार कोसळेल, असेही राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलं. ते सिंधुदुर्गमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राहुल नार्वेकर म्हणाले, “सरकार पडणार की नाही, हे सभागृहातील बहुमतावर अवलंबून आहे. कुणाच्याही भविष्यवाणीकडे पाहण्याची मला आवश्यकता नाही. कारण, संविधानात सरकार पडणे आणि टिकण्याबद्दल तरतुदी आहेत. संख्याबळ असेल, तर सरकार टिकते. विधिमंडळात संख्याबळ नसेल, तरच सरकार कोसळेल.”

“…हे संविधानाने दिलेल्या तरतुदीच्या विरोधात आहे”

“हे सरकार संविधानाच्या तरतुदीनुसार निवडून आलं आहे. सरकारने बहुमत सिद्ध केलं आहे. सरकार पडेल, अशी भविष्यवाणी करणं, हे संविधानाने दिलेल्या तरतुदीच्या विरोधात आहे,” असंही नार्वेकरांनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“…तर उचित कारवाई करेन”

“पक्षांतर बंदी झाली का नाही, हा निर्णय आदित्य ठाकरेंना घ्यायचा नाही. हा निर्णय विधानसभा अध्यक्षांना घ्यायचा आहे. त्यामुळे मी विधानसभा अध्यक्ष असल्याने सर्व नियम, संवैधानिक आणि १० व्या अनुसूचीनुसार तरतुदींचं पालन करून अपात्रतेचा निर्णय घेणार आहे. कुठेही पक्षांतरबंदी कायद्याचं उल्लंघन झाले असेल, तर उचित कारवाई करेन,” असं राहुल नार्वेकरांनी म्हटलं.