हवामान खात्याकडून मुंबई शहरासह उर्वरीत महाराष्ट्रात उद्या (गुरूवारी) पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. अरबी समुद्रामध्ये आगामी २४ तासांत ‘पवन’ आणि ‘अम्फन’ ही दोन चक्रीवादळं निर्माण होण्याची शक्यता असल्याने, मुंबई, पुणे व नाशिक या प्रमुख शहरांमध्ये उद्या पाऊस पडणार असल्याचे ‘स्कायमेट’कडून सांगण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चक्रीवादळाची शक्यता लक्षात घेता प्रशासनाकडून संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या अगोदर ‘क्यार’ या चक्रीवादळाने अरबी समुद्रात ज्याप्रमाणे स्थिती निर्माण केली होती, त्याचप्रमाणे सध्या समुद्रात स्थिती निर्माण झाली असल्याचे सांगण्यात आले आहे. एकाच वेळी दोन चक्रीवादळांची निर्मिती होणं ही परिस्थिती दुर्मिळ मानली जाते.

माध्यमांमधील माहितीनुसार अम्फन चक्रीवादळ हे पूर्व-मध्य अरबी समुद्रात येण्याची शक्यता आहे, या वादळाचा परिणाम मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्रासह गोवा आणि दक्षिण गुजरातच्या भागांत दिसू शकतो. तर, पवन चक्रीवादळ सोमालियाच्या दिशेने मार्गक्रमण करणार असून, ते अगोदर उत्तर पश्चिम आणि त्यानंतर पश्चिम दिशेने पुढे जाणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यादरम्यान वाऱ्याचा वेग हा प्रतितास ४० ते ५० किलोमीटर राहण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rainfall forecast for the rest of maharashtra including mumbai pune msr
First published on: 04-12-2019 at 21:19 IST