Raj Thackeray in Bhivandi : निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आले असून १८ नोव्हेंबर रोजी प्रचारफेऱ्या थांबणार आहेत. त्याआधी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये जाऊन स्टारप्रचारक सभा घेत आहेत. राज ठाकरेंनीही यंदाच्या निवडणुकीत मुसंडी मारली असून राज्यातील विविध कोपऱ्यात जाऊन प्रचारसभा घेत आहेत. परंतु, गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचारसभांमुळे राज ठाकरेंची प्रकृती नाजूक झाली असल्याची माहिती राज ठाकरेंनी आज दिली. त्यामुळे त्यांनी भिवंडीतील भाषण अवघ्या दोन मिनिटांतच भाषण संपवलं. तिथून ते कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात गेले.

राज ठाकरे आज भिवंडी विधानसभा मतदारसंघात होते. तिथे जनतेला संबोधित करताना त्यांचा आवाज बारीक झाला होता. ते म्हणाले, “मी सगळीकडे बोलून आलो. काय बोलायचं ते सांगितलं. पण हे ऐकायला कोणी तयार नसतात. माझी थोडीशी प्रकृती नाजूक आहे. थोडं बरं वाटत नाहीय. म्हणून मी तुमचं दर्शन घेण्याकरता आलो. प्रत्यक्षात भेटलो. पण २० तारखेला गाफिल राहू नका. आपले मित्र परिवार नातेवाईक या सर्वांना येत्या २० तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान करायचं आवाहन करा.”

हेही वाचा >> MNS Manifesto : मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध; ब्लू प्रिंटच्या अनेक मुद्द्यांचा समावेश, महाराष्ट्रासाठी राज ठाकरेंनी काय आश्वासने दिली?

मनसे जाहीर केला जाहीरनामा

राज ठाकरेंनी चार भागात जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यापैकी पहिल्या भागात मुलभूत गरजा, दर्जेदार जीवनमान, पुरेसं अन्न, पिण्याचं पाणी, कायदा, सुव्यवस्था, महिला सुरक्षा, क्रिडा, बालसंगोपन, प्राथमिक शिक्षण आणि रोजगार याचा उल्लेख आहे.

दुसरा भाग – दळणवळण, वीज, पाण्याचं नियोजन, महाराष्ट्राभर शहरांचे जाळे, घनकचरा व्यवस्थापन, मलनिस:रण, मोकळ्या जागा, पर्यावरण आणि जैवविवधता

तिसरा भाग – राज्याचं औद्योगिक धोरण, व्यापार धोरण, प्रशासन आणि उद्योग नियंत्रण, कृषी, पर्यटन आणि व्यावसायिक शिक्षण

चौथा भाग – मराठी अस्मिता, मराठी भाषेचा प्रचार, दैनंदिन वापरात मराठी, व्यवहारात मराठी, डिजिटल जगात मराठी जागतिक व्यावसीफाटवर मराठी, गड किल्ले संवर्धन, पारंपरिक खेळ.