लोकसत्ता प्रतिनिधी
सोलापूर : मराठा आरक्षण प्रश्नावर आंदोलनाचे मनोज जरांगे-पाटील यांच्याविरुद्ध आरोपसत्र आरंभल्यानंतर बार्शीचे भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शीत बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मराठा आरक्षण प्रश्नावर राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन तातडीने बोलवावे, तसेच मराठा समाजास ओबीसींमधून आरक्षण द्यावे की नाही याबाबत सर्वच पक्ष, नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी आमदार राऊत यांनी या वेळी केली आहे.बार्शीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ शेकडो समर्थक कार्यकर्त्यांसह आमदार राऊत यांनी सकाळी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी त्यांना विविध संस्था, संघटनांचा पाठिंबा मिळाला.

राऊत म्हणाले, की मराठा आरक्षण प्रश्नावर सुरू असलेले आंदोलन हे भरकटलेले आहे. या प्रश्नी राज्यातील प्रमुख पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मराठा समाजास ओबीसींमधून आरक्षण देण्याबाबत राज्यातील सर्व प्रमुख पक्षांनी आपली भूमिका आता स्पष्ट करण्याची वेळ आलेली आहे. अनेक पक्ष या भूमिकेबाबत मौन बाळगून मराठा समाजाची मते घेत आहेत. मात्र त्यांची भूमिका ते स्पष्ट करत नाहीत. लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्यांनी देखील अद्याप या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. आता आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष, त्यांच्या नेत्यांनी मराठा समाजास ओबीसींमधून आरक्षण देण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. या प्रत्येकाची भूमिका स्पष्टपणे जनतेसमोर आली पाहिजे, म्हणजे जनतेलाही कुणाला मतदान करायचे हे ठरवता योईल. अनेक पक्ष या मुद्द्यावर मोघम भूमिका घेत समाजाला फसवत आहेत. यांना आता असे समाजाच्या भावनांशी खेळता येणार नसल्याची टीकाही राऊत यांनी या वेळी केली. दरम्यान प्रत्येक पक्षाची या विषयावरची भूमिका अधिकृतपणे समोर येण्यासाठीच राज्य विधी मंडळाचे विशेष अधिवेशन कायद्यानुसार मजबूत व्यासपीठ आहे. म्हणून विधानसभेचे सभापती ॲड. राहुल नार्वेकर यांना आपण पत्र लिहून पाठपुरावा केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी यापूर्वीच चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Ajit Pawar Amol Kolhe
Amol Kolhe : अजित पवार म्हणाले, “आता आपणच साहेब”, अमोल कोल्हे प्रत्युत्तर देत म्हणाले, “राज्यात दोनच साहेब, एक शरद पवार, दुसरे…”
shambhuraj desai on mukhyamantri ladki bahin yojana
Ladki Bahin Yojana: “लाडकी बहीण नाही, ‘मुख्यमंत्री’ लाडकी बहीण योजना म्हणा”, शंभूराज देसाईंनी सुनावलं; महायुतीमध्ये श्रेयवादाची चढाओढ?
Ashish Deshmukh On Dhananjay Munde Dilip Walse Patil
Ashish Deshmukh : महायुतीत धुसफूस? धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटलांवर भाजपा नेत्याचे गंभीर आरोप; म्हणाले, “अनिल देशमुखांच्या दबावामुळे…”
Bhagyashri Atram On Ajit pawar
Bhagyashree Atram: “अजित पवारांनी मला ज्ञान देण्यापेक्षा…”, भाग्यश्री आत्राम यांचा जोरदार पलटवार; भाषणातून चौफेर टीका
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
dharmarao baba atram on daughter bhagyashree atram (1)
Bhagyashree Atram with Sharad Pawar: “त्यांनी नवीन वडील शोधलेत”, धर्मराव बाबा अत्राम यांची लेकीवर आगपाखड; म्हणाले, “मी त्यांना शिकवण्यात कमी पडलो”!

हेही वाचा >>>Bhagyashree Atram: “अजित पवारांनी मला ज्ञान देण्यापेक्षा…”, भाग्यश्री आत्राम यांचा जोरदार पलटवार; भाषणातून चौफेर टीका

काहींकडून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न

मराठा महासंघाचे दिवंगत नेते अण्णासाहेब पाटील यांच्या विचारातून आपण मराठा आरक्षण प्रश्नाकडे पाहात असल्याचा दावा करीत आमदार राऊत यांनी या प्रश्नावर कोणीही राजकारण करू नये. मराठा समाजाला आरक्षण देताना प्रामाणिक भावना असावी. या प्रश्नासाठी आंदोलन करत काहींकडून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. भूमिका स्पष्ट न करता आंदोलन करणाऱ्यांविरुद्ध आपण आवाज उठवू, असा इशाराही त्यांनी दिला. हे ठिय्या आंदोलन दररोज सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत चालणार असून, त्यानंतर प्रमुख नेत्यांकडे आपला पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे आमदार राऊत यांनी सांगितले.