देशात नरेंद्र मोदींचे सरकार आले, तर गोपीनाथ मुंडे कृषिमंत्री होतील आणि मग ते सध्याचे कृषिमंत्री शरद पवार यांचे वाभाडे काढतील, अशी भीती वाटत असल्यानेच पवार हे मुंडे यांचा तीव्र विरोध करीत असल्याचे मत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोपीनाथ मुंडे यांनी मंगळवारी परळीतील जाहीर सभेत व्यक्त केले.
बीडमधील भाजपचे उमेदवार आणि पक्षाचे राष्ट्रीय नेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचारासाठी राजनाथसिंह यांनी परळीमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. यासभेमध्ये त्यांनी अपेक्षेप्रमाणे शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला.
ते म्हणाले, देशात मोदींचे सरकार आले, तर गोपीनाथ मुंडे देशाचे कृषिमंत्री होतील आणि मग ते आपण केलेल्या कामाचे जाहीरपणे वाभाडे काढतील, अशी भीती शरद पवार यांना वाटते आहे. त्यामुळेच पवार मुंडे यांचा तीव्रपणे विरोध करीत आहेत.
दोन दिवसांपूर्वीच मुंडे यांनीही शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. शरद पवार ३-४ दिवस बीडमध्ये मुक्कमाला आहेत, खरंतर त्यांनी कायमचेच बीडमध्ये राहायला यावे, असा उपरोधिक टोला मुंडे यांनी पवार यांना लगावला होता.
संग्रहित लेख, दिनांक 8th Apr 2014 रोजी प्रकाशित
मुंडे कृषिमंत्री होण्याच्या भीतीनेच पवारांचा त्यांना विरोध – राजनाथसिंह
बीडमधील भाजपचे उमेदवार आणि पक्षाचे राष्ट्रीय नेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचारासाठी राजनाथसिंह यांनी परळीमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती.
First published on: 08-04-2014 at 04:07 IST
TOPICSराजनाथ सिंहRajnath Singhलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Electionशरद पवारSharad Pawar
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajnath singh criticized sharad pawar in a rally at parali