सांगली : ऊसदराची मागणी मान्य झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुरु असलेले ठिय्या आंदोलन ३६ तासानंतर मागे घेण्यात येत असल्याची घोषणा माजी खासदार राजू शेट्टी यांनी मध्यरात्री केली. सांगलीतील दत्त इंडिया संचलित वसंतदादा कारखान्यावर शेट्टींचे ३६ तास सुरु असलेले काटा बंद आंदोलन सुरु होते. एफआरपी अधिक १०० रुपये प्रती टन मिळावेत अशी मागणी होती. दत्त इंडिया कारखाना प्रशासनाकडून मान्य करण्यात आली. सांगलीमधील दत्त इंडिया संचलित वसंतदादा साखर कारखान्याकडून स्वाभिमानीच्या मागणीपेक्षा अधिक दर देण्याचं मान्य करण्यात आले आहे.

गेल्या दिवसांपासून सांगली जिल्ह्यात आंदोलन सुरु झाल्यावर बैठकाही झाल्या होत्या,मात्र त्या निष्फळ ठरल्या होत्या,त्यामुळे स्वाभिमानीकडून गेल्या दोन दिवसांपासून सांगलीत दत्त इंडिया संचलित वसंतदादा कारखान्यासमोर रविवारपासून काटाबंद आंदोलन करत आक्रमक पवित्रा घेण्यात आला होता. जोपर्यंत निर्णय होत नाही,तो पर्यंत मागे हटणार नाही,अशी भूमिका जाहीर करण्यात आली होती.तर आंदोलनामुळे कारखान्याचे गाळप देखील बंद झालं होते. अखेर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर जिल्हा प्रशासनाकडून साखर कारखानदार, स्वाभिमानी शेतकरी संघटना अशी बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली. मात्र ही बैठक देखील निष्फळ ठरली.त्यानंतर राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला आणि साखर कारखानदारांना आंदोलन तीव्र करण्याचा गर्भित इशारा देत,वसंतदादा साखर कारखान्यासमोरील आंदोलन सुरूच ठेवलं होतं.यामुळे अखेर दत्त इंडियाकडून दर देण्याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

Water tariff, Kalyan Dombivli, Administration decision,
कल्याण डोंबिवलीकरांना जुन्या दरानेच यावर्षीही पाणी दर आकारणी, पाणी दर न वाढविण्याचा प्रशासनाचा निर्णय
bmc, mumbai municipal corporation, Tree Lights, Citing Environmental Concerns, tree lights in mumbai, mumbai tree lights, bmc Orders Removal of Tree Lights, mumbai news, environment news, dangerous for insects, bmc news, marathi news,
झाडांवरील रोषणाई सात दिवसात हटवा, पालिका प्रशासनाचे विभाग कार्यालयाना आदेश
BSNL, 4G, 5G, services, Central Government
बीएसएनएलला अजूनही ४ जी, ५ जीची प्रतीक्षा! केंद्र सरकारकडून दिरंगाई
nashik, malegaon, clerk arrested, ration office, Accepting Bribe, Register Needy Families, Welfare Schemes, malegaon bribe case,
नाशिक : लाच स्वीकारताना कारकुनास अटक

हेही वाचा… Maharashtra Assembly Winter Session 2023 Live: “जस्टिस लोया आत्महत्या प्रकरणाची…”, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मागणी!

हेही वाचा… धक्कादायक : राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा

यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दत्त इंडियाकडून मिळालेल्या पत्राच्या अनुसरून स्वाभिमानीच्या मागणी पेक्षा अधिक दर देण्याचं मान्य करत असल्याचं लेखी पत्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात आले. यामुळे शेट्टींनी वसंतदादा कारखान्यासमोर सुरू असलेला काटा बंद आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर करत इतर उर्वरित १५ कारखान्यांच्या विरोधात आंदोलन सुरूच राहील,असे स्पष्ट केले आहे.तर आता या पुढील आंदोलन हे शिराळा तालुक्यातल्या दालमिया साखर कारखान्यावर असणार असल्याचेही जाहीर करत सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना दर देण्यामध्ये आडकाठी असणाऱ्या झारीतल्या शुक्राचार्यांच्या कारखान्या बाबतीतही लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल असेही स्पष्ट केले आहे.