माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपाची साथ सोडत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. खडसे यांनी मागील कित्येक वर्षे भाजपा पक्षाचे काम केले. याच कारणामुळे जळगाव जिल्ह्यात भाजपाचा विस्तार होऊ शकला. जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघातून एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे या खासदार आहेत. मात्र त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रक्षा खडसे यांना भाजपा तिकीट देणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावरच आता रक्षा खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा >>> “ताई महाराष्ट्रातील सोसायट्या, कारखाने कुणी चाटून पुसून खाल्ले?” भाजपाचा सुप्रिया सुळेंना सवाल!

मात्र पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल…

“मला वाटतं की लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. एका वर्षापेक्षा कमी कालावधी राहिलेला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र तसेच देशभरात लोकसभा उमेदवारीबाबत वेगवेगळे विषय समोर येत आहेत. मात्र रावेर लोकसभा निवडणुकीबाबत सध्या पक्षात कोणतीही चर्चा नाही. मात्र पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल, त्या अनुषंगाने आम्ही काम करू. आज खासदार म्हणून रावेर लोकसभा मतदारसंघाची माझ्यावर जबाबदारी आहे,” असे रक्षा खडसे म्हणाल्या.

हेही वाचा >>> “लग्न लावायचं गंगूशी अन् संसार…”, फडणवीसांच्या गौप्यस्फोटावरून आंबेडकरांचा शरद पवारांना टोला

पक्षाने दुसऱ्यांना तिकीट दिले तर…

“भविष्यात पक्षाने मला ही जबाबदारी दिली, तर त्याच विश्वासाने मी काम करेन. मात्र पक्षाने दुसऱ्यांना तिकीट दिले तर मी प्रामाणिकपणे काम करेन. आज अनेकांची नावे समोर येत आहेत. त्यांना तिकीट मिळाले तर मी त्यांच्यासाठी काम करेन. मला तिकीट मिळाले तर ते माझ्यासाठी काम करतील,” असेही रक्षा खडसे यांनी सांगितले.

हेही वाचा >>> Video : …अन् नागपूर विमानतळावरील ‘ते’ दृश्य पाहून शिव ठाकरेही थक्क झाला, नेमकं घडलं तरी काय?

माझ्याकडे सध्या एक वर्षे आहे…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आमच्यासाठी पक्षश्रेष्ठींचा निर्णय महत्त्वाचा आहे. माझ्याकडे सध्या एक वर्षे आहे. विकासाचे खूप मुद्दे आहेत. काम करण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत. माझे त्याकडे लक्ष आहे. वर्षभर या चर्चा होतच राहणार आहेत,” असेही रक्षा खडसे म्हणाल्या.