शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी ( २३ जानेवारी ) शिवशक्ती-भीमशक्तीच्या युतीची घोषणा केली. अद्यापही महाविकास आघाडीतले घटक काँग्रेस-राष्ट्रवादीशी युतीबद्दल चर्चा सुरु आहे. अशातच प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना लक्ष्य केलं. शरद पवार आजही भाजपाबरोबर आहेत, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं. यानंतर राष्ट्रवादीकडून प्रकाश आंबेडकरांवर टीका करण्यात येत आहे. तर, आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही यावर भाष्य केलं आहे.

‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, “प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेशी मी सहमत नाही. मराठवाडा विद्यापीठ नामांतर हा अडचणीचा विषय सोडवण्यासाठी शरद पवारांनी सहकार्य केलं. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांबद्दल शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट मांडली आहे.”

Narendra Modi and prakash ambedkar
“भारतीय मुसलमान घुसखोर…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांची टीका; काँग्रेसलाही केलं लक्ष्य!
Narendra Modi death threat
“जगभरात मोदींच्या हत्येचा कट”, भाजपाच्या नेत्याचं खळबळजनक विधान; म्हणाले, “मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर…”
vanchit bahujan aghadi marathi news, prakash ambedkar party symbol marathi news
ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या ‘कुकर’चे ‘प्रेशर’ कुणावर? ईश्वरचिठ्ठीवर लागला चिन्हाचा निकाल…
sanjay raut prakash ambedkar (4)
“वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला”, प्रकाश आंबेडकरांच्या आरोपांवर संजय राऊत म्हणाले, “आम्ही आता त्यांना…”

हेही वाचा : “गौतम अदानी आणि पंतप्रधानांचे संबंध पाहता…”, ‘हिंडनबर्ग’च्या अहवालावरून काँग्रेसची चौकशीची मागणी; म्हणाले…

“प्रकाश आंबेडकरांना काय हवं, याची माहिती नाही. दुसऱ्या बाजूला संजय राऊतांना ओळखत नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंबरोबरच्या युतीबद्दल साशंकता आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र राहतील, असं वाटत नाही,” अशी स्पष्ट भूमिका रामदास आठवले यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : “कल्याण-डोंबिवलीची जागा वाचली तरी पुरे” म्हणणाऱ्या राऊतांना शिंदे गटाचं प्रत्युत्तर; म्हणाले, “आंबेडकरांनी तुमची…”

“उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले तरी, त्याला शिवशक्ती आणि भीमशक्ती म्हणता येणार नाही. त्याला शिवशक्ती आणि वंचित शक्ती म्हणता येऊ शकते. या युतीने महाराष्ट्राच्या राजकारणात फारसा फरक पडेल, असं वाटत नाही,” असा दावाही रामदास आठवलेंनी केला आहे.