scorecardresearch

“ही तर शिव शक्ती आणि वंचित शक्ती”; उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीवर रामदास आठवलेंची टीका

आठवले म्हणाले, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्रित आल्याने भाजप, शिंदे गट आणि आरपीआय या आमच्या महायुतीवर काहीच परिणाम होणार नाही.

“ही तर शिव शक्ती आणि वंचित शक्ती”; उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीवर रामदास आठवलेंची टीका
उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीवर रामदास आठवलेंची टीका

उद्धव ठाकरे यांनी किती ही प्रयत्न केला. तरीदेखील आंबेडकरी मतदार आमच्यासोबत राहणार आहे. शिव शक्ति भीम शक्ति म्हणता येणार नाही. ही तर शिव शक्ति आणि वंचित शक्ती म्हणता येईल, अशा शब्दात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीवर टीका केली. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

हेही वाचा- “कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध झाली पाहिजे”, रामदास आठवलेंची भूमिका

यावेळी रामदास आठवले म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्यासोबत १८ ते २० टक्के शिवसेना राहिली असून त्यांची ताकद क्षीण झाली आहे. त्यामुळे आता त्यांची धडपड सुरू झाली आहे. हे लक्षात घेऊन प्रकाश आंबेडकर यांनासोबत घेण्याचा निर्णय घेतला असला तरी शिव शक्ति भीम शक्ति म्हणता येणार नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना शिव शक्ति भीम शक्तिचा प्रयोग झाला होता. त्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत यश मिळाल आहे. पण खरी भीम शक्ति आपल्यासोबत आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्रित आल्याने भाजप, शिंदे गट आणि आरपीआय या आमच्या महायुतीवर काहीच परिणाम होणार नाही. तसेच आम्हाला आगामी निवडणुकीत प्रचंड यश मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा- “देवेंद्रजी तुम्ही सुडाचे राजकारण करत आहात”; सुषमा अंधारे यांची टीका

तसेच ते पुढे म्हणाले की, शिंदे आणि फडणवीस सरकारचा लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होईल. त्यामध्ये आरपीआयला निश्चित स्थान दिल जाईल असे आश्वासन मिळालं आहे. तसेच राज्यपाल नियुक्त १२ आमदारांमध्ये एक जागा आरपीआयला मिळावी. तसेच महामंडळ आणि विविध समित्यावर कार्यकर्त्यांना संधी देण्यात यावी, अशी मागणी केल्याच त्यांनी सांगितले.

हेही वाचा- चिंचवड जागेसाठी ठाकरे गट आग्रही! शिवसेना भवनातील बैठकीनंतर संजय राऊत म्हणाले; “राष्ट्रवादीने कसे लढावे हे…”

भाजपने आरपीआयला दुर्लक्षित करू नये

शिंदे फडणवीस सरकारच्या अनेक कार्यक्रमात आरपीआयचा उल्लेख टाळला जात आहे. त्यावरून आरपीआय कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. त्या प्रश्नावर रामदास आठवले म्हणाले की, एकनाथ शिंदे भाजप सोबत आले आहे. ती चांगली गोष्ट असून भाजपने आरपीआयच नाव घेतल पाहिजे.आरपीआय सुरुवातीपासून सोबत आहे. राज्यात भाजपा आणि शिवसेनेला युती म्हणून ओळख होती.पण आरपीआय सोबत आल्याने महायुती म्हणून ओळख मिळाली आहे.त्यामुळे आरपीआयला दुर्लक्षित करू नये. त्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची भूमिका रामदास आठवले यांनी मांडली.

हेह वाचा- “देवेंद्र फडणवीस आपसे ये उम्मीद न थी”, सुप्रिया सुळेंची टीका; म्हणाल्या, “उगाच खोट्या- नाट्या गोष्टी पसरवू नका”

राज्यपालांनी जाऊ नये अस वाटत

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पद मुक्त करण्याची इच्छा व्यक्ती केली आहे.त्या प्रश्नावर रामदास आठवले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अपमान करण्याचा हेतू राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा नव्हता.पण विरोधका मार्फत राज्यपालांविरोधात वातावरण तयार करण्यात आल. त्या सर्व गोष्टीना कंटाळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पत्र लिहिले असावे.त्यावर पंतप्रधान निर्णय घेतील.पण आम्हाला वाटत त्यांनी जायला नको,अशी भूमिका त्यावर त्यांनी मांडली.

हेही वाचा-

आरपीआयच अधिवेशन शिर्डीत होणार

आगामी निवडणुका लक्षात आरपीआयमध्ये सर्व समाजातील कार्यकर्ता येण्याची गरज आहे.हे लक्षात घेऊन शिर्डीत अधिवेशन घेणार आहे.त्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजपचे नेते मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सह अनेक नेते उपस्थित मंडळींना मार्गदर्शन करतील अस आमच नियोजन असल्याच रामदास आठवले यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-01-2023 at 18:03 IST

संबंधित बातम्या