महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचे प्रयत्न झाले. मुंबईचे तत्कालीन पोलीस कमिशनर संजय पांडे यांना महाविकास आघाडीने माझ्यावर गुन्हा दाखल करून मला अटक करण्याची सुपारी दिली होती, असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहेत. या आरोपानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आरोपाचे खंडन करण्यात आले आहे. या आरोपानंतर ठाकरे गटाच्या प्रवकत्या सुषमा अंधारे यांनी फडणवीसांवर टीका केली आहे.

हेही वाचा- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या पुस्तकाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शनिवारी पुण्यात प्रकाशन

The University Grants Commission UGC has decided to allow universities to conduct postgraduate degree courses online remotely pune news
एकीकडे मोकळीक, दुसरीकडे नियमांचे बंधन… शिक्षण संस्थांचे म्हणणे काय?
mutha canal
मुठा कालव्याच्या दोन्ही बाजूला जमावबंदीचे आदेश
A donation of Rs 1 crore was received due to the social media post pune news
समाजमाध्यमांतील पोस्टमुळे मिळाली एक कोटींची देणगी!
Mango exports were hit hard by the Israel Palestine war Pune news
इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाचा आंबा निर्यातीला मोठा फटका…झाले काय?

देवेंद्रजी यांना एक सांगू इच्छिते की, आपणदेखील मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीला किती अधिकार असतात. हे देखील तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे तुमच्या विधानाला काही अर्थ नाही. आदित्य ठाकरे यांना एका प्रकरणात अडकविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे आजवरच्या अनेक घडामोडीमधून देवेंद्रजी सुडाचे राजकारण करित असल्याच सांगत ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

हेही वाचा- “आदित्य ठाकरे मंत्री असताना डाव्होस दौऱ्यानंतर लंडनमध्ये…”, निलेश राणेंचा खोचक सवाल!

फोन टॉपिंग प्रकरणी संजय पांडे यांच्यावर कारवाई करण्यात आली. पण देवेंद्र फडणवीस रश्मी शुक्ला यांच्यावर का कारवाई करत नाहीत. यातून देवेंद्र फडणवीस हे कपटी राजकारणी आहेत. अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा त्यांनी साधला. भाजपाचे नेते आशिष शेलार यांच्यावर टीका करताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, आशिष शेलार यांनी आपल्या घरात कंपाउंड लावून घेतली पाहिजे. मी काय बोलत आहेत. त्यावेळी आशिष शेलार यांना नक्कीच कळले अशा शब्दात त्यांनी त्यांच्यावर निशाणा त्यांनी साधला.

हेही वाचा- पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपाचा उमेदवार कोण असणार? चंद्रकांत पाटलांनी दिले संकेत; म्हणाले, “भाऊंच्या…”

तसेच त्या पुढे म्हणाल्या की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी दरम्यान भाजपच नेतृत्व अमित शाह हे मातोश्रीच्या पायर्‍या का झिजवत होते. शाह यांना विचारा अपयशी नेत्याकडे कशाला सारखे येत होता. तुमच्यासोबत आल्याने आमच्या दहा जागा कमी झाल्या आहेत. त्यामुळे आमच्यासाठी ते अपयशी आहेत. अशा शब्दात आशिष शेलार यांच्यावरही टीका केली आहे.

हेही वाचा- पुण्यात जातपंचायतीच्या निर्णयामुळे कुटुंब २३ वर्षांपासून बहिष्कृत; जातीत परत घेण्यासाठी सव्वा लाखांचा दंड; पंचाच्या विरोधात गुन्हा दाखल

प्रकाश आंबेडकर माझे विचार एकच

प्रकाश आंबेडकर यांनी सुषमा अंधारेंना ओळखत नसल्याचे विधान केले होते. या विधानानंतर अंधारेंनी प्रतिक्रिया दिली आहे. भिमशकी शिवशकी युती झाली चांगली आहे. माझ्यावर टीका केली नाही.प्रकाश आंबेडकर मला ओळखत नाही म्हटले होते. आता मी त्यांना भेटले आणि ओळख वाढवेल. माझा आणि त्याचा विचार एकच असल्याच त्यांनी सांगितले.

हेही वाचा- नव्या संगणकप्रणालीचा म्हाडा सोडतीला फटका? घरांसाठी ६० हजारांपैकी केवळ १८७१ अर्ज मंजूर

महागाई आणि बेरोजगारीचा विकास मोदींनी केला

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौर्‍यावर आले होते. त्यावेळी विकास कामा बाबत भाषण केले. त्या भाषणत उद्धव ठाकरे यांच्या पुढे भाषणाची टेप जात नव्हती. तर महागाई आणि बेरोजगारीचा विकास मोदीनी केला आहे.बाकी त्यांनी काही नाही.अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सुषमा अंधारे यांनी टीका केली. तसेच त्या सभेतील भाषण पाहून लवकरच महापालिका निवडणूक लागेल आणि त्यानंतर राज्यात २०२४ पूर्वी निवडणुका लागु शकते.अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.