महसूलमंत्री एकनाथ खडसे शिवसेनेविरुद्ध भुईमुगाच्या शेंगांवरून शरद पवार यांचीच भाषा बोलत आहेत. सत्तेमुळे त्यांना संवेदना राहिली नाही. शेंगा कुठे येतात यावर चर्चा करण्याऐवजी दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्यांना आठ दिवसांत मदत जाहीर करा अन्यथा हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा शिवसेना नेते रामदास कदम यांनी दिला. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी कृष्णा खोऱ्यातील २१ टीएमसी पाणी देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
शिवसेनेचे नेते आमदार दिवाकर रावते, सुनील प्रभू, विजय शिवदरे, बालाजी किन्हीकर यांच्या पथकाने मंगळवारी जिल्ह्य़ात काही गावांची पाहणी केली. त्यानंतर पत्रकार बठकीत कदम यांनी सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली. जिल्हाप्रमुख अनिल जगताप, बाळासाहेब िपगळे आदी उपस्थित होते. कदम म्हणाले, की मराठवाडय़ासह अनेक भागात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसेना विरोधी पक्षाच्या भूमिकेत रस्त्यावर उतरली आहे. सरकार मात्र कागदी घोडे नाचवून वेळ मारून नेत आहे.
नरेंद्र मोदी यांनी मुंबई-अहमदाबाद रेल्वेसाठी ४० हजार कोटी रुपये दिले. मग दुष्काळातील शेतकऱ्यांसाठी २० हजार कोटी रुपये का देऊ नयेत? सरकारने आठ दिवसांत दुष्काळ जाहीर करुन वीजबिल माफीसह इतर सवलती द्याव्यात. ७ डिसेंबपर्यंत सरकारने या बाबत निर्णय न घेतल्यास नागपूरचे हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdas kadam slams eknath khadse
First published on: 26-11-2014 at 12:20 IST